घरातून ९३ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:21+5:302021-07-17T04:11:21+5:30
--------------- युवकातच्या डोक्यावर टिकास मारली वरूड : जमा केलेली रेती नेल्या आरोप करीत शिवीगाळ करून युवकाला टिकास डोक्यावर मारून ...
---------------
युवकातच्या डोक्यावर टिकास मारली
वरूड : जमा केलेली रेती नेल्या आरोप करीत शिवीगाळ करून युवकाला टिकास डोक्यावर मारून जखमी करण्यात आले. ही घटना १५ जुलै रोजी सकाळी जरूड येथे घडली. विजय साहेबराव सोनोने यांच्या तक्रारीवरून सुनील सुरजुसे (४०, रा. जरुड) विरुद्ध वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------
पीक नुकसानीवरून हातावर कुऱ्हाडीने वार
धारणी : शेतातील मका पीक गुरांनी खाल्ल्याच्या कारणावरून गुरांच्या मालकाला शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारून जखमी केले. ही घटना १५ जुलै रोजी भादोबल्ला भंवर शिवारात दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. भिमसिंग बद्री भाबर यांच्या तक्रारीवरून मला भुरेला चव्हाण (रा. दादरा) विरुद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------------
घरात घुसून महिलेचा विनयभंग
धारणी : घरात मुलाबाळांसह झोपलेल्या महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना बैराटेकी येथे १३ जुलै रोजी रात्री ३ वाजता दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी सखाराम मोतीलाल भिलावेकर (रा. बैराटेकी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------
भरधाव दुचाकीची महिलेला धडक
तिवसा : शेतातून घरी येत असलेल्या महिलेला भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले. ही घटना निंभोरा येथे १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. फिर्यादी सागर साहेबराव ढगे यांच्या तक्रारीवरून एमएच २७ डीएम ५१३५ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराविरुद्ध तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------
डोक्यावर दगड मारून जखमी केले
दर्यापूर : शेताची मोजणी मला मान्य नसल्याचे सांगत डोक्यावर दगड मारून जखमी करण्यात आले. ही घटना हिंगणीमिर्झापूर येथे १५ दोन दिवसापूर्वी घडली. शालिकराम गवळी यांच्या तक्रारीवरून सतीश गणेश गावंडे (४५, रा. हिंगणीमिर्झापूर) विरुद्ध दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------------
अर्भक जमिनीत पुरले
शिरजगाव कसबा : एका महिलेने प्रसूती लपविण्याच्या उद्देशाने खड्ड्यात नवजात टाकल्याची घटना स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत खरपी गावात १५ जुलै रोजी उघडकीस आली. पोलीस पाटील संजय भगत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
शेतातून येताना महिलेचा विनयभंग
शिरजगाव कसबा : शेतातून घरी येताना अचानक मागून येऊन विनयभंग केल्याची घटना ईश्वरपेठ करजगाव येथे १५ जुलै रोजी घडली. ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नीलेश रघुनाथ मोहोड (३२, रा. भट्टीपुरा, करजगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------
चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा छळ
शिरजगाव कसबा : नापसंती दर्शवित चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्यासही तगादा लावल्याच्या महिलेच्या तक्रारी शिरजगाव पोलिसांनी मो. अर्षद मो. जफर, मो. जफर मो. कदीर, फिरोजा बानो मो. जफर (सर्व रा. देऊरवाडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------
घरातून आठ हजारांचा मुद्देमाल लंपास
आसेगाव पूर्णा : लग्नाला गेल्याची संधी पाहून चोरट्याने घरात प्रवेश केला. तीन कट्टे गव्हासह नगदी ५ हजार रुपये असा ८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना राजनापूर्णा येथे दोन दिवसापूर्वी घडली. सुभाष अमृतराव जामोदकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.