रतन इंडियाच्या रेल्वेमार्गामुळे बाधित शेतजमीन एमआयडीसीने अधिग्रहित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:43 PM2018-08-28T21:43:34+5:302018-08-28T21:44:25+5:30

रतन इंडियाच्या रेल्वे मार्गामुळे शेतजमीनीचे तुकडे पडले. या प्रदूषणामुळे तेथील पिकेही खराब होत आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी या जमिनीचा अहवाल तयार करावा. एमआयडीसीद्वारा ही जमीन अधिग्रहित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अधिकाºयांना दिल्यात.

Land acquisition of Ratan India by the railway route should be acquired by MIDC | रतन इंडियाच्या रेल्वेमार्गामुळे बाधित शेतजमीन एमआयडीसीने अधिग्रहित करावी

रतन इंडियाच्या रेल्वेमार्गामुळे बाधित शेतजमीन एमआयडीसीने अधिग्रहित करावी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रतन इंडियाच्या रेल्वे मार्गामुळे शेतजमीनीचे तुकडे पडले. या प्रदूषणामुळे तेथील पिकेही खराब होत आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी या जमिनीचा अहवाल तयार करावा. एमआयडीसीद्वारा ही जमीन अधिग्रहित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अधिकाºयांना दिल्यात.
आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तिवसा मतदारसंघातील कामासंदर्भात मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सदर निर्देश दिलेत. तिवसा येथील दयाराम मकेश्वर यांच्याकडे ७० हजारांचे कर्ज आहे. यापैकी ६२ हजारांचे कर्ज माफ झाले. उर्वरित ८ हजार बँकेने त्यांना भरायला लावले असतानाही नव्याने कर्ज देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली होती. यावर आश्चर्य व्यक्त करीत जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाने शेतकºयांची दीड लाखांची कर्जमाफी केली असल्याने या शेतकºयाजवळून ८ हजारांचा भरणा करून घेणे चुकीचे आहे. हे सर्व शेतकरी पात्र असल्याने त्यांना त्वरित व नव्याने कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश लीड बँकेच्या व्यवस्थापकाला दिले.
तिवसा तालुक्यातील धारवाड येथील १४४ लाभार्थ्यांना नवीन गावठाणातील घरे बांदकामासाठी १.६८ कोटीच्या पुनर्वसन अनुदानास मंजुरी मिळण्याची विनंती आ. यशोमती ठाकूर यांनी केली असता, जिल्हाधिकाºयांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी रामदास शिद्धभट्टी यांना याविषयीच्या सूचना केल्यात. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, लीड बँकेचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शाहू महाराज वाचनालयाचा प्रस्ताव त्वरित पाठवा
शाहू महाराज वाचनालयासाठी तिवसा येथील खुल्या अभिन्यासातील १० टक्के जागा मिळण्यासाठी नगरपंचायतींनी सर्वानुमते ठरावदेखील दिलेला आहे. या वाचनालयास जागा उपलब्ध होण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित ठराव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा. हा प्रस्ताव शासन मंजुरातीसाठी पाठविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. याविषयीच्या सूचना त्यांनी जिल्हा भूसंपादन अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांना देखील केल्या. नगरपंचायतीने वाचनालयास जागा उपलब्ध करण्याविषयीचा प्रस्तावाविषयक आवश्यक तरतुदीची माहिती सिद्धभट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव वानखडे यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Land acquisition of Ratan India by the railway route should be acquired by MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.