रेल्वेची जमीन शेती व्यवसायाच्या वापरात

By Admin | Published: May 7, 2017 12:12 AM2017-05-07T00:12:55+5:302017-05-07T00:12:55+5:30

तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती.

Land of Railway | रेल्वेची जमीन शेती व्यवसायाच्या वापरात

रेल्वेची जमीन शेती व्यवसायाच्या वापरात

googlenewsNext

शेतकऱ्यांचा आक्षेप : अन्थया शेतजमीन परत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती. मात्र या सुपीक जमिनीचा वापर ज्या कामासाठी व्हायला पाहिजे तो होत नसल्याने ही सर्व जमीन शेतीव्यवसायासाठी रेल्वेमधील काही कर्मचारी वापर करीत आहेत. त्यामुळे अधिग्रहित केलेली ही सर्व शेतजमीन शेतकऱ्यांना शासनाने परत द्यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली.
शिराळा परिसरातील सुपीक जमीन सन १९९४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रेल्वे लाईनच्या कामाकरिता अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. शासन निर्माधीन व सार्वजनिक प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही विरोध न करता जमीन दिली. मात्र आजच्या स्थितीत ही सर्व शेतजमीन रेल्वे विभागातील काही गॅगमन पदावरील कर्मचारी या जमिनीचा वापर शेतीसाठी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिणामी केंद्र शासनाच्या सन २००३ च्या निर्णयानुसार दिलेल्या जमिनीचा उद्देश बदलल्यास शेती मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी, असा नियम आहे. यानुसार सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेली प्रकाश साबळे, प्रशात ढोरे, संजय बडे आदी उपस्थित होते.

Web Title: Land of Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.