‘अप्पर वर्धा’ची कसदार जमीन मिळणार भाडेपट्टीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:16+5:302021-09-23T04:14:16+5:30
पान ३ साठी आवश्यक अमरावती/ मोर्शी : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात काठाभोवतीची गाळपेर जमीन रबी व उन्हाळी हंगामात ...
पान ३ साठी आवश्यक
अमरावती/ मोर्शी : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात काठाभोवतीची गाळपेर जमीन रबी व उन्हाळी हंगामात भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात काठाभोवतीची ३४२.५० मी. ते ३४३ मी. तलावातील अमरावती जिल्ह्यातील २९८.२२ हेक्टर व वर्धा जिल्ह्यातील ३०.६० हेक्टर गाळपेर जमीन रबी हंगामात पेरणीसाठी उपलब्ध होऊ शकते. तसेच तलाव ३४० मी. ते ३४२.५० मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील ८०६ व वर्धा जिल्ह्यातील ५३ हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरिता उपलब्ध असते.
ज्या व्यक्तीची जमीन नवीन जलाशय, उत्पल बांध, धरण इत्यादी बांधण्यासाठी संपादित केलेली आहे किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचा प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहोचलेली आहे, अशी व्यक्ती. स्थानिक भूमिहीन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, ज्यामध्ये बहुसंख्य मागासवर्गीय सहकारी सदस्य आहेत, अशा मागासवर्गीय आणि मागास वर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक, इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत, त्या गावाच्या बाहेरील भूमिहीन लोक. वरील लोकांव्यतिरिक्त इतर स्थानिक भूमीधारक परंतु खंड(एक) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीपैकी असलेल्यांना ही जमीन भाडेपट्टीने मिळणार आहे.
//////////
बॉक्स १
३१ ऑक्टोबरपूर्वी अर्ज पोहोचणे आवश्यक
उपलब्ध होणारी गाळपेर जमिनीच्या मौजे व शेत सर्व्हे व मूळ मालकनिहाय यादी व १०० रुपयांच्या स्टँप पेपरवरील करारनामा प्रारूप व अर्जाचे प्रारूप उपविभागीय अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१ मोर्शी येथे उपलब्ध आहे. त्याप्रमाणे आपला प्रारूप अर्ज व करारनामा उपविभागीय अधिकारी, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१ मोर्शी येथे ३१ ऑक्टोबरपर्यंत द्यावा. वरील अग्रक्रमानुसार पात्र लाभार्थींना प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त १.२० हेक्टर भाडेपट्टीवर देण्यात येईल.