भूमिहिनांना मिळणार बक्षीसपत्रात जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:24+5:302021-03-26T04:14:24+5:30
अमरावती : ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत ज्या लाभार्थींकडून जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ...
अमरावती : ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत ज्या लाभार्थींकडून जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या बाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहजिल्हा निबंधक यांना पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
केंद्र व राज्य शासना मार्फत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भूमिहीन लाभार्थींना घरकुलाचा लाभ देत असताना अनेक लाभार्थ्यांना कडे स्वमालकीच्या जागा उपलब्ध नसतात अशा लाभार्थींना घरकुलाच्या लाभापासून तसेच मंजुरीपासून वंचित राहावे लागते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूमिहीन लाभार्थी असून, रक्तातील नात्यांमध्ये बक्षीसपत्राद्वारे आणखी ४ हजार ७१८ लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये आधीच असलेल्या कामाचा ताण व सर्व्हरमधील अडचणीमुळे एका दिवशी ३० पेक्षा अधिक जास्त नोंदणी होऊ शकत नाही. सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे प्रतिदिन १७ दस्त नोंदणी केली जात आहे. ही अडचण लक्षात घेता १४ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय २६ ते २८ मार्च या दरम्यान सुरू ठेवून विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी १४ तालुक्यांच्या सहनिबंधकाना पत्र पाठवून केल्या आहेत.