शेतकरी संख्या तफावतीने जिल्ह्याचे मोठे नुकसान

By admin | Published: April 16, 2017 12:03 AM2017-04-16T00:03:23+5:302017-04-16T00:03:23+5:30

पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या नुकसान भरपाई यादीमध्ये शेतकऱ्यांची पहिली संख्या व निधी मिळाल्यानंतरच्या यादीत वाढ झालेली संख्या यामध्ये तफावत आहे.

Large losses in the district due to the number of farmers | शेतकरी संख्या तफावतीने जिल्ह्याचे मोठे नुकसान

शेतकरी संख्या तफावतीने जिल्ह्याचे मोठे नुकसान

Next

जगताप यांचा आरोप : प्रशासनाच्या बेपर्वाईने नुकसान भरपाईचा कमी निधी
अमरावती : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या नुकसान भरपाई यादीमध्ये शेतकऱ्यांची पहिली संख्या व निधी मिळाल्यानंतरच्या यादीत वाढ झालेली संख्या यामध्ये तफावत आहे. यामुळे जिल्ह्यास मिळणाऱ्या निधीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आ.वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत केला.
प्रशासनाने अंदाजित शेतकरी संख्येची यादी शासनाला पाठविली. त्यानुसार १०९ कोटींचा निधी मिळाला. नंतर मात्र शेतकरी संख्येत वाढ दाखविण्यात आली.


दुसऱ्या यादीत लाभार्थी संख्यावाढ
अमरावती : जेवढा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला, तेवढ्या निधीमध्येच सर्व शेतकऱ्यांना वाटप आटोपले, असा आरोप आ.जगताप यांनी केला. नेहमीच तलाठी स्तरावर यादीमध्ये फेरफार होते व धनदांडग्यांना लाभ मिळतो व खरा लाभार्थी यामध्ये वंचित राहतो, असे ते म्हणाले. या घोळामुळे जिल्ह्याचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घोळासाठी चौकशी समिती नेमा, अशी मागणी त्यांनी चर्चेदरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांना केली. प्रशासन घाईघाईने खोटी माहिती शासनाला सादर करते व नंतर भ्रष्टाचार करण्यासाठी शेतकरी संख्यावाढ केली जाते, असे आ. जगताप म्हणाले.

Web Title: Large losses in the district due to the number of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.