स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात कम्युनिकेशन क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:08+5:302021-08-22T04:16:08+5:30
जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने ...
जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन
अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने संगणक क्रांती झाली. त्यामुळेच देश खऱ्या अर्थाने विकसित झाला, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते शुक्रवारी (दि. २०) जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण व शहरच्या वतीने आयोजित स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला संबोधित करताना बाेलत होते.
यावेळी कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी देशाची धुरा हाती घेताच देशात संगणक क्रांती आणि पर्यायाने कम्युनिकेशनमध्ये देशाने अग्रणी प्रगती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. केंद्र शासनावर टीका करीत देशात महागाईला व आर्थिक व्यवस्थेला खिळखिळा करणारा भाजप पक्ष जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आज कोणताही घटक सुखी नाही, खऱ्या अर्थाने आता एकसंध होऊन केंद्रातदेखील काँग्रेसची सत्ता आणली पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी अभिवादन करीत काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये यापेक्षाही मजबूत करण्याकरिता सर्वांनी कटिबद्ध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शहरात कॉंग्रेस पक्ष मजबूत करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्हा काॅंग्रेस व शहर काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी,पक्षाचे नगरसेवक, अल्पसंख्याक सेल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यू. आय.,महिला काॅंग्रेस, आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बॉक्स ,
आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा
आगामी काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व पंचायत समित्यांच्या तसेच सहकार क्षेत्रामधील बँक व अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत; त्यामुळे जिल्ह्यात आता या सहकार क्षेत्रावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरदेखील काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.