थाेडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:28+5:302021-02-12T04:13:28+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी बुधवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ८० अधिकारी ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी बुधवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. ही लस घेतल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंगदुखी व ताप आल्याने गुरुवारी झेडपी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
.................................................
सीईओंनी घेतली कोरोना लस
अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी १० फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. याशिवाय अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुध्दा लसीकरणाचा लाभ घेतला.
.........................................
काजना ते धनज रस्ता उखडला
नांदगाव खंडेश्र्वर : तालुक्यातील काजना ते धनज हा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी नादुरुस्त रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
......................
प्रारूप मतदार याद्या जाहीर
ग्रामपंचायत सार्वत्रिक तसेच रिक्त पदाच्या पोट निवडणुकीकरिता पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार अमरावती तालुक्यातील पार्डी व इंदला या ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्या ११ फेब्रुवारी रोजी संबंधित तलाठी व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
........................................
भारनियमनामुळे नागरिक त्रस्त
अमरावती : महावितरण कंपनीकडून ग्रामीण भागात मनमानीपणे भारनियम केले जात आहे. विशेष म्हणजे दिवसा व रात्रीही हा प्रकार सातत्याने सुरू असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने भारनियमन बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.