विधी महाविद्यालयात नेट-सेट क्रॅश कोर्सचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:06+5:302021-09-03T04:14:06+5:30

२०२१ हे विधी महाविद्यालया स्थापनेचे अमृत महोत्सव असून, त्याप्रीत्यर्थ विद्यार्थी कल्याणाकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी कल्याणाकरिता उपक्रमांच्या ...

Launch of Net-Set Crash Course in Law College | विधी महाविद्यालयात नेट-सेट क्रॅश कोर्सचा शुभारंभ

विधी महाविद्यालयात नेट-सेट क्रॅश कोर्सचा शुभारंभ

Next

२०२१ हे विधी महाविद्यालया स्थापनेचे अमृत महोत्सव असून, त्याप्रीत्यर्थ विद्यार्थी कल्याणाकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी कल्याणाकरिता उपक्रमांच्या श्रुंखलेतील नेट-सेट क्रश कोर्स हा एक उपक्रम असून, हा एक महिन्याचा क्रॅश कोर्स संपूर्णपणे आभासी पद्धतीने होणार आहे. नेट ही परीक्षा प्राध्यापक नियुक्तीकरिता उपयुक्त असून, पीएचडीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांना एम पॅट परीक्षेमधून सूट देण्यात येते तसेच नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट च्या विविध महाविद्यालयांमध्ये स्कॉलरशिप उपलब्ध आहेत व विविध सरकारी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधीसुद्धा आहेत. प्रथमच महाविद्यालय स्तरावर असा उपक्रम राबविला जात असून आजच्या या क्रॅश कोर्सचे उद्घाटन डॉ. विजयकुमार चौबे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वर्षा देशमुख होत्या. विद्यार्थिहिताकरिता संपूर्ण भारतातील तज्ज्ञ व्याख्यात्यांची फळी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. डॉ. शाइस्ता इनामदार (नाशिक), डॉ. रमादेवी गुडमेला (हैदराबाद), डॉ. उमेश अस्वार (मुंबई), डॉ. क्षीप्रा सिंघम (वर्धा), डॉ. श्वेता सिरस्कार (मुंबई), डॉ. योगेश बैस (गोंदिया), डॉ. प्रतिमा लोखंडे (नागपूर), डॉ. आनंद राऊत (मुंबई), डॉ. दीपक लोखंडे, प्राध्यापक महेंद्र इंगोले, डॉ. मनीष वाडीवे, डॉ. संगीता बिहाडे (सर्व रा. अमरावती) यांचे मार्गदर्शन लाभले. नेट क्रॅश कोर्सचे समन्वयक प्राध्यापक चैतन्य घुगे आहे. विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी लॉ सीईटी हा उपक्रमसुद्धा डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राची कडू व आभार प्रदर्शन डॉक्टर मनीष वाडिवे यांनी केले.

Web Title: Launch of Net-Set Crash Course in Law College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.