गायवाडी येथे सावित्रीबाई फुले कन्या सन्मान योजनेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:28+5:302021-08-18T04:17:28+5:30
दर्यापूर : तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिनी सावित्रीबाई फुले कन्या सन्मान योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार स्थानिक रहिवाशाच्या घरी ...
दर्यापूर : तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिनी सावित्रीबाई फुले कन्या सन्मान योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार स्थानिक रहिवाशाच्या घरी मुलगी जन्माला आल्यास त्यांच्या १००१ रुपये व सन्मानपत्र देऊन सत्कार केला जाईल.
योजनेचे प्रथम लाभार्थी ज्ञानेश्वर रामकृष्ण उंबरकर यांना १००१ रुपये व शाल-श्रीफळ देऊन सरपंच देवता विनोद वानखेडे व उपसरपंच सुनीता विलास साखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मानकर, विलास साखरे, ग्रामपंचायत सदस्य दीपिका लांडे, सोनू येलोने, पुनाबाई चव्हाण, अलका साखरे, विष्णू डिके, गणेश खंडारे, भुलू पवार, सुनीता नि. साखरे, रीतेश लांडे, निळू साखरे, प्रफुल सांगळूदकर, गजानन सावईकर, गजानन गावंडे, हरिभाऊ नागे, पांडुरंग अडबोल, तुळशीदास अडबोल, देविदास पातुर्डे, शिवा उंबरकर, ज्ञानेश्वर लकडे, संजय साखरे, मनोज ताकोते, रामकृष्ण पाचडे, धनराज साखरे, कर्मचारी दशरथ रोंघे, रोजगार सेवक मंगेश बुंदे, प्रवीण साखरे, किसन निबोळकर हे उपस्थित होते.