चांदूर रेल्वे शहरात ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:36+5:302021-07-30T04:13:36+5:30
# चांदूर रेल्वे शहरात ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवात # मंडळ अधिकारी कार्यालयात अनेकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण चांदूर ...
# चांदूर रेल्वे शहरात ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवात
# मंडळ अधिकारी कार्यालयात अनेकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण
चांदूर रेल्वे : शहरात ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी स्थानिक मंडळ अधिकारी कार्यालयात राबविण्यात आला. अनेकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी विनाखंड व्हावी, यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान होत असून, शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सदर उपक्रम शहरातील मंडल अधिकारी कार्यालयात राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत चांदूर रेल्वेच्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सतीश गोसावी, तलाठी दीपक चव्हाण, बाजड, कोतवाल शीतल मडावी, काडंलकर, अनिल साबळे यांनी उपस्थित नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार दुरुस्ती, उत्पन्नाचे दाखले दिले, पुरवठा विभागातील राणी आंबेकर, संजय गांधी विभागातील राहुल कुकडे या चमुंनी, संजय गांधी, श्रावणबाळ योजना विभागातील समस्यांचे निराकरण करण्यात आले. शेती पांदण रस्ते, अंत्योदय योजना यासंबंधी समस्यांचे निराकरण केले शहरातील अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला.
(फोटो - चांदूर रेल्वे - मंडळ अधिकारी कार्यालयात समस्यांचे निराकरण करतांना कर्मचारी)
290721\img-20210729-wa0020.jpg
photo