तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

By admin | Published: November 13, 2016 12:06 AM2016-11-13T00:06:20+5:302016-11-13T00:06:20+5:30

कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे.

Launch of wedding ceremony from Tulsi wedding | तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

Next

प्राचीन काळापासून परंपरा कायम : पाच दिवस गुंजणार मंगलाष्टके
चांदूरबाजार : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे. प्राचीन रितीरिवाजानुसार तुळशीच्या विवाहानंतरच सामान्यत: विवाह सोहळ्याला सुरुवात होते. आजही काही लोक कटाक्षाने या परंपरेचे पालन करताना दिसून येतात. केवळ ग्रामीण जीवनामध्येच नव्हे, तर शहरी फ्लॅट संस्कृतीमध्येही तुळशीचे महत्त्व जपले जात आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी संस्कृतीतही तुळशीचे महत्त्व कटाक्षाने जपले जाते.
आंगणात तुळस हा कुठल्याही घराचा अविभाज्य भाग मानला जातो. तुळशीचा विवाह हा विष्णुशी किंवा बाळकृष्णाच्या मुर्तीशी लावला जातो. त्याकरिता उस, झेंडूची झाडे किंवा कणीस असलेला ज्वारीच्या धांड्यांच्या गुडीचा मांडव केला जातो. तुळशीच्या मुळाशी बोरे, चिंच, आवळे तसेच हरभऱ्याच्या हिरवा पाला ठेवतात. तुळशी वृंदावनाला रंगकाम करून त्यावर नक्षीकाम काढून सुशोभित केले जाते. अंतरपाट विधी केली जाते. विष्णुच्या या जागृतीचा उत्सव काळात प्रबोधन उत्सव व तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. तुळशीला उभ्या मंजिरी येतात. तुळसीचा रस त्वचारोगावर गुणकारी आहे. वातावरणातील दूषित वायू शोषण करून प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख झाडांत तुळशीचे श्वास सर्वात वरचे आहे. तुळशी विवाहानिमित्ताने या बहुपयोगी व गुणकारी वनस्पतीचे रोपन व संवर्धन केले जात असल्याची प्रथा आजही सुरू सुरू आहे. एक उत्कृष्ठ वनौषधीचे योग्य जतन करण्याकरिता कदाचित आपल्या पूर्वजांनी तुळशी विवाहाची प्रथा पाडली असावी. (तालुका प्रतिनिधी)

ज्वारीच्या हुरड्यांचा प्रसाद
ग्रामीण भागात तर तुळशी विवाहाचा उत्साह आजही आढळून येतो. ज्वारीच्या कोवळ्या कणीसांचा हुरडा हातावर प्रसाद म्हणून टाकला जातो तर शहरी भागातही काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा होताना दिसतात. परंपरा थोडीफार बदलली आहे.

Web Title: Launch of wedding ceremony from Tulsi wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.