चिखलदरा पर्यटन स्थळावर लावणी, आदिवासी नृत्य

By admin | Published: February 27, 2017 12:16 AM2017-02-27T00:16:00+5:302017-02-27T00:16:00+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवात विविध साहसिक उपक्रम सुरू असून शनिारी मोर्शीचे आमदार व पुण्याच्या पर्यटकांनी त्यांचा थरार अनुभवला.

Lavani, tribal dance at Chikhaldara tourism place | चिखलदरा पर्यटन स्थळावर लावणी, आदिवासी नृत्य

चिखलदरा पर्यटन स्थळावर लावणी, आदिवासी नृत्य

Next

अनिल बोंडेंचे थरार : पर्यटकांनी फेरली पाठ, वेळ चुकली
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवात विविध साहसिक उपक्रम सुरू असून शनिारी मोर्शीचे आमदार व पुण्याच्या पर्यटकांनी त्यांचा थरार अनुभवला. दिवसभर पर्यटकांनी पाठ फेरली असताना रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मात्र चांगलीच गर्दी होऊ लागली आहे.
चिखलदरा पर्यटन महोत्सवात शनिवारी सायंकाळी हिंदी गीतांसह, हास्यविनोदी कार्यक्रमांचे सादरीकरण सागर कारंडे आणि चमुनी केले, तर रविवारी दिवसभर येथील विविध पॉइंटवर रॅपलिंग, व्हॅली कॉसिंग, वॉटर फॉल रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, मॅराथॉन, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद स्थानीक नागरिकांसह आलेल्या मोजक्या पर्यटकांनी घेतला. सोमवारी महोत्सवादरम्यान आदिवासी लोकनृत्य स्पर्धा तथा विविध साहसी उपक्रम घेतले जाणार आहे. सोबतच सायंकाळी ७ वाजता कीर्ती आवळे लावणी प्रस्तूत करतील. (तालुका प्रतिनिधी)

आमदार बोंडेंनी केला थरार
मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांनी येथील नेवास्कर यांच्या साहसी उपक्रम केंद्रात व्हॅली कॉसिंग, रॅपलिंग, वॉटरफॉल रॅपलिंगचा साहसी अनुभव घेतला. चिखलदरा पर्यटन स्थळावर येताना आपल्या दुरच्या नातेवाईकांनासुद्धा अणण्याचा सल्ला देत त्यांनी विकासासाठी सर्व पठाररांगा बोडख्या होत असल्याने त्यावर हिरवेकंच वृक्ष जगविण्याची अपेक्षा वर्तविली.

Web Title: Lavani, tribal dance at Chikhaldara tourism place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.