लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची आज पूजा

By Admin | Published: November 11, 2015 12:18 AM2015-11-11T00:18:06+5:302015-11-11T00:18:06+5:30

श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो प्रज्ज्वलित केलेले दिवे

Laxmi, Kuber, the new Krsuni today is worshiped | लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची आज पूजा

लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची आज पूजा

googlenewsNext

मोहन राऊत अमरावती
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो प्रज्ज्वलित केलेले दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे़
दिवाळी हा सण आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत हा सण साजरा करण्यात येतो़ बळी राजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता़ त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला तीन पायांत जमीन दान मागितले़ विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य व्यापून घेतले़
बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याच्या आठवणी निमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते़ दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता़ यामुळे आनंद झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता़ इ़स़ २५०० वर्षापूर्वी गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती़ जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता़ महावीर सवंत त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते़ त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरूवात मानतात़ प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे़ लक्ष्मी आश्विन अमावस्येच्या रात्री सर्वच घरी संचार करून आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान या दिवशी शोधू लागते जिथे स्वच्छता, शोभा व रसिकता आढळते तिथे ती आकर्षित होते़ शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष संयमी व क्षमाशील पुरूष आणि गुणवत्ता व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात त्या घरी लक्ष्मीला जाणे आवडते, अशी आख्यायिका आहेत.
लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल, अथवा पिवळे वस्त्र टाकतात. त्यावर स्वस्तिक काढावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पूजेसाठी सोने, चांदी, नाणे, नोटा, नारळ, खोबरवाटी, खडीसाखर, बत्तासे, फळे, लवंगा, धने, साळीच्या लाह्या ठेवाव्यात ते़ घरात गाईची पाऊले, लक्ष्मीचे पाऊले काढल्यानंतर व सर्व प्रथम तेलाचा दिवा लावतात.

Web Title: Laxmi, Kuber, the new Krsuni today is worshiped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.