यशोमतींचे नेतृत्त्व पुन्हा एकवार सिद्ध
By admin | Published: December 1, 2015 01:22 AM2015-12-01T01:22:54+5:302015-12-01T01:22:54+5:30
नवनिर्मित तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजकन्या नीळकंठ खाकसे यांची नगराध्यक्षपदी
काँग्रेसची सत्ता : नगराध्यक्षपदी राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव वानखडे
तिवसा : नवनिर्मित तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजकन्या नीळकंठ खाकसे यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वैभव सतीश वानखडे यांनी ११ मते मिळवून विजय संपादन केला. सोमवारी त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी वैभव वानखडे आणि धनराज थूल यांचे अर्ज आले होते. त्यापैकी धनराज थूल यांना पाच मते मिळाली, तर वैभव वानखडे यांनी ११ मते मिळविली. नगरसेविका सविता सुरजुसे या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका निवडणुकीदरम्यान तटस्थ राहिल्यात. सचिन गोरे व भूषण यावले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. तिवस्यात काँग्रेस विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहार असे सारेच पक्ष एकवटले होते. या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे दहा सदस्य निवडून आले होते.
विजयाचा जल्लोष
तिवसा : पैकी एक े्अपक्ष देखील काँग्रेसमध्ये सामिल झाल्याने ११ सदस्यसंख्या झाली होती. नगराध्यक्षपदासाठी राजकन्या खाकसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीदरम्यान अध्यासी अधिकारी म्हणून शिवाजी जगताप तर सह अध्यासी अधिकारी म्हणून विजय लोखंडे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजकन्या खाकसे व उपनगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या निवडीचा जल्लोष आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेसविरोधात झाडून सारे एकत्र आले होते; तथापि नागरिकांनी टीका - आरोपांना बाजूला सारून विकासाला कौल दिला.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा.