रेल्वेने जाणाऱ्या ऑक्सिजन टँकला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:07+5:302021-06-09T04:16:07+5:30
फोटो पी ०८ ऑक्सिजन बडनेरा : रेल्वेने जाणारे ऑक्सिजन टँक लीक झाल्याची बाब बडनेरा रेल्वे स्थानकावर सोमवारी उशिरा ...
फोटो पी ०८ ऑक्सिजन
बडनेरा : रेल्वेने जाणारे ऑक्सिजन टँक लीक झाल्याची बाब बडनेरा रेल्वे स्थानकावर सोमवारी उशिरा रात्री लक्षात आली. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी पावसामुळे लीकेज थांबले, असे सूत्रांनी सांगितले.
गुजरातच्या मुद्रापोर्ट येथून आंध्र प्रदेशातील शांतानगर येथे एका कंपनीचे ऑक्सिजन भरलेले टँक रेल्वेने वाहून नेले जात होते. सोमवारी रात्री दहा वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एका टँकमध्ये लीकेज झाल्याची बाब लक्षात येताच सदर गाडी रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर उभी करण्यात आली. बारा तास उलटल्यानंतरही टँकमधून लीकेज सुरूच होते. त्यासाठी तंत्रज्ञ बोलाविण्यात आले, मात्र त्यांनी दुरुस्ती करण्यापूर्वी पावसामुळे लीकेज थांबले, असे सांगण्यात आले. नेमके लिकेज कशामुळे झाले, हे मात्र कळू शकले नाही.
बडनेरा रेल्वे स्थानकाचे अधिकारी, सुरक्षा बलाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची या घटनेमुळे तारांबळ उडाली होती. कर्मचारी त्याठिकाणी तैनात करण्यात आले. ऑक्सिजन टँक रुग्णांच्या उपचारासाठी नेले जात असल्याची माहिती मिळाली.