चिमुकल्यांमध्ये ‘लर्निंग डिसऑर्डर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:32 PM2019-03-17T22:32:41+5:302019-03-17T22:35:02+5:30
'तारे जमी पे' या चित्रपटात दाखविलेल्या मुलाप्रमाणे अमरावतीतही 'लर्निंग डिसऑर्डर' आजाराचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षक मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष न करता, त्यांना योग्य मार्गदर्शन करून उपचार करायला हवा.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'तारे जमी पे' या चित्रपटात दाखविलेल्या मुलाप्रमाणे अमरावतीतही 'लर्निंग डिसऑर्डर' आजाराचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षक मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष न करता, त्यांना योग्य मार्गदर्शन करून उपचार करायला हवा.
लहानपणपासून आई-वडील, आजी-आजोबांच्या लाडात वाढलेली बहुंताश मुले शाळेत गेल्यानंतर शिक्षणात कसे राहील, हे सांगता येत नाही. काही मुले शाळेत गेल्यावर मौजमस्ती करीत शिक्षणाकडे लक्ष देतात. क्वचीतच काही मुले शिक्षणात रस नसलेले आढळतात. अ,आ,ई वाचण्यापासून तर स्पष्ट बोलणेसुद्धा एखाद्या मुलाला कठीण होते. तो ‘ढ’ आहे, असे, आपसुक वाक्य अन्य मुलांच्या तोंडून निघते. शाळेतील अन्य मुले त्या मुलाला चिडवू लागतात. त्यामुळे तो आणखीच निराश होतो. अशा मुलांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचा आणखी तणाव वाढतो, ते मानसिक तणावात येतात. तो मुलगा असा का वागतो, त्याला सर्वसामान्यासारखे वागणे-बोलणे का जमत नाही, ही बाब जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. तो मुलगा 'लर्निग डिसअॅबिलिटी किंवा डिसआर्डर'चा आजारी असू शकतो. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'तारे जमी पर' या हिन्दी चित्रपटात एक मुलगा शिक्षणात गोंधळलेल्या अवस्थेत दाखविण्यात आला आहे. तो मुलगा लर्निंग डिसआॅर्डर आजारी असल्याचे दाखविले आहे. त्या मुलाला अभिनेता अमीर खान सारखा शिक्षक कशाप्रकारे हाताळतो, त्याला कशाप्रकारे शैक्षणिकसह जीवन प्रवाहात आणतो, याचे सुंदरसे उदाहरण या चित्रपत्रातून समाजापुढे मांडले आहे. 'लर्निग डिसआॅर्डर' हा आजार अमरावतीत काही वर्षांपूर्वी क्वचीतच मुलांमध्ये आढळून येत होता. मात्र, आता हे प्रमाण वाढला आहे. पूर्वी एखाद्या मुलगा 'लर्निंग डिसऑर्डर' असल्याचे आढळत होते. आता ११ मुले या आजाराने ग्रस्त असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी वर्तविले आहे.
शिक्षण अक्षमता काय आहे?
सहजपणे शिकणे, शिक्षणक्षमतेसह मुले आणि प्रौढ वेगळ्या गोष्टी पाहतात, ऐकतात आणि समजून घेतात. यामुळे नवीन माहिती आणि कौशल्य शिकण्यामध्ये आणि त्याचा वापरताना अशा मुलांना समस्या निर्माण होऊ शकते. शिकण्याच्या अक्षमतेतील सर्वसामान्य प्रकारांमध्ये वाचन, लेखन, गणित, तर्क, ऐकणे आणि बोलणे यासारख्या समस्या आहेत.
शहरात लर्निंग डिसऑर्डरची ११ मुले
मानसोपचारतज्ज्ञ श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनातील चमुने शहरातील काही शाळकरी मुलांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहेत. या सर्वेक्षणात त्यांना ११ मुले लर्निंग डिसआॅर्डरची आढळून आली आहेत. या मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी काही शिक्षकांना मुंबईतील एका संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा मुलांना ते योग्य मार्गदर्शन करीत शिक्षण व जीवन प्रवाहात आणत असल्याची माहितीही त्यांनी 'लोकमत'ला दिली.
शिकण्याच्या अक्षमतेची चिन्हे आणि लक्षणे
शाळेत जाण्यापूर्वीच काही मुलांना शब्द उच्चारताना कठीण जाते. योग्य शब्द शोधता येत नाही, वर्णमाला, संख्या, रंग, आकार, आठवड्याचे दिवस शिकण्यात समस्या येते. दिशानिर्देशांचे पालन करण्यात अडचणी येते. क्रॅयन्स, पेन्सिल आणि कात्री किंवा रेषा अंतर्गत रंग नियंत्रित करण्यास अडचण येते. बूट, झिप्पर, स्नॅप, बूट बांधण्यास अचडण जाते. ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये अक्षरे आणि ध्वनींमधील कनेक्शन शिकण्यात समस्या येते. ध्वनी ऐकून शब्द तयार करण्यात गोंधळतात. नवीन कौशल्ये जाणून घेण्यासाठी धिमे, सातत्यपूर्ण शब्दांचे चुकीचे शब्द उच्चारतात आणि वारंवार चुका करतात. मूलभूत गणित संकल्पना शिकण्यास समस्या, वेळ सांगणे आणि क्रम लक्षात ठेवणे अडचण जाते. १० ते १३ वयोगटातील काही मुलांना समज किंवा गणित कौशल्य वाचण्यात अडचण येते. मुक्त-चाचणीची समस्या, नापसंती वाचन आणि लेखन; मोठ्याने वाचणे टाळते, वर्ग चर्चा आणि जोरदार विचार व्यक्त करताना समस्या, एकाच डॉक्युमेंटमध्ये एकसारखे शब्द वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते.
काय आहे शिक्षण क्षमता?
शिक्षणक्षमता ही बुद्धिमत्ता किंवा प्रेरणेची समस्या नाही. शिकण्याची क्षमता असलेली मुले आळशी किंवा मूर्ख नाहीत. खरे तर, सर्वसामान्य मुलांप्रमाणेच तेही हुशार आहेत. त्यांचे मेंदू वेगळ्या प्रकारे रचनात्मक आहेत. हा फरक कशाप्रकारे करता येईल आणि प्रक्रिया कशी करेल, यावर परिणाम करते.
लर्निंग डिसऑर्डरने आजारी असलेल्या मुलांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. पूर्वी क्वचितच हा आजार एखाद्या मुलामध्ये आढळत होता. अलिकडे तब्बल ११ मुले लर्निंग डिसआॅर्डरची आढळली आहेत. अशा मुलांवर शिक्षक व पालकांनी लक्ष द्यायला हवे, त्यांच्यावर उपचार करायला हवा.
- श्रीकांत देशमुख,
मानसोपचारतज्ज्ञ,