मार्डी देवस्थानात ३०० गार्इंची जपली जाते अबोल व्यथा
By admin | Published: November 8, 2016 12:16 AM2016-11-08T00:16:12+5:302016-11-08T00:16:12+5:30
नजिकच्या मार्डी ते कारला रोडवरील जंगलाशेजारी असलेले तीन संतांच्या मार्डी मंदिर परिसरातील गौरक्षणात आजही मातेसमान एक हजार गार्इंची जोपासना केली जात आहे.
पोहरा बंदी : नजिकच्या मार्डी ते कारला रोडवरील जंगलाशेजारी असलेले तीन संतांच्या मार्डी मंदिर परिसरातील गौरक्षणात आजही मातेसमान एक हजार गार्इंची जोपासना केली जात आहे. द्वापार युगापासून आजही हिंदू धर्मातील पुज्यनीय ठरलेल्या गोमातेला गौरक्षणाच्या माध्यमातून संरक्षण व संगोपनाचे काम मार्डीचे गुरुदास महाराज अविरतपणे करीत आहेत. महाराजांना पवित्र कामासाठी नित्यनेमाने गार्इंना पाणी पाजण्याचे कार्य पार पाडतात. तसेच ज्वारीचे पीठ खायला दिले जाते. दररोज गार्इंना आंघोळ घालावी लागते व त्यांच्या अंगावरील सफाई करण्यात येते. औषधोपचार तसेच तोंडखुरी, पायखुरी व तपासणी करण्यात येते. दररोज सकाळ व संध्याकाळी चारापाणी दिल्या जातो. एखाद्या गाईची प्रकृती चांगली नसली की गाईला वाचविण्यासाठी महागड्या औषधीवर प्रचंड खर्च करावा लागतो. पाचशे ते सहाशे गायींसाठी गौरक्षणात ३० फूट लांबी व रुंदी, वीस फुटांचे टिनशेड उभारण्यात आले. हा सर्व खर्च भाविक व महाराज स्वत: भागवितात. मंदिराची व गौरक्षणाची देखभाल करणारे गुरुदास महाराज यांनी तर या गौरक्षणाच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. नित्य पाणी व चारा मिळणाऱ्या खाऊमुळे गायींना मंदिराशी लळा लागला आहे. या गौरक्षणात गाईंची काळजी वाहणारे या समाजात पहावयास मिळतात. (वार्ताहर)