संत्राबागांंमध्ये पानगळ; झाडे झाली खराटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:46+5:302021-02-15T04:12:46+5:30
पान २ चे लीड उपादक चिंताग्रस्त : संकटांची मालिका संपणार तरी केव्हा? शेंदूरजनाघाट : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या ...
पान २ चे लीड
उपादक चिंताग्रस्त : संकटांची मालिका संपणार तरी केव्हा?
शेंदूरजनाघाट : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरूड, मोर्शी भागांतील संत्राबागा अक्षरश: खराटा झाल्या आहेत. संत्रा झाडे वाळत चालल्याने उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. संत्रा झाडांवर पानगळीचे संकट उद्भवले आहे. शेंदूरजनाघाट परिसरातील सातनूर, पुसला, वाई, धनोडी, मालखेड, झटामझिरी, वरूड, जरूड, लोणी, चांदस वाठोडा, सुरळी, कुरळी, तिवसाघाट, बेनोडा, हिवरखेड, पुसली या परिसरात शेतकरी अंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतात. पण, यंदा बहराने दगा दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
मागील वर्षी अंबिया बहराच्या संत्रा फळाला कवडीमोल भाव मिळाला. यंदा अंबिया बहार फुलेल, या आशेवर उत्पादक असताना पुन्हा निराशाच पदरी आली. अनेक संत्रा झाडांवर अंबिया बहार फुलला नाही, तर उलट संत्रा झाडावर अति पानगळ सुरू झाली. यामुळे संत्रा झाडे खराटा झाल्याचे दिसून येत आहे. कोळसी रोग तसेच झाडांवर बारीक शंकू असल्याने संत्रा झाडाच्या मोठमोठ्या फांद्या वाळत असून, पाणी दिल्यावर शेंडेवाढ मोठया प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे अंबियाची फूट झाली नाही, तर दुसरीकडे झाडे खराट्यासारखी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, अद्यापही तालुक्याचा कृषी विभागाला जाग आलेली नाही. पीकेव्ही किंवा अन्य कुठलीही तज्ज्ञ मंडळी घेऊन कृषी अधिका०यांनी संत्रा झाडे का वाळत चालली आहेत, याची कारणमीमांसा करून योग्य उपाययोजना सुचवाव्यात, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकºयांना आहे.
कोट
कृषी विभागाने कोळसी, शंकुरोग, डिंक्या या रोगांवरील उपाययोजनांवर शेतकºयांना मार्गदर्शन करावे. शासनाने फवारणीकरिता मोफत औषध पुरवठा करावा.
प्रफुल कुबडे, संत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाट
कोट
यावर्षी संत्रा झाडे खराटा झाली आहेत. अंबिया बहर फुलला नाही. कोळसी, शंकू रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येत आहे. याकरिता १०० टक्के अनुदानावर औषध उपलब्ध करून देण्यात यावे.
सतीश काळे, संत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाट
कोट ३
यंदा पावसाळयात अतिपाऊस झाला. यामुळे पानगळ मोठया प्रमाणात झाली आहे. सोबतच शंकू, कोळशी या रोगाचे प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने मार्गदशन करावे. फवारणीकरिता मोफत औषध पुरवठा करण्यात यावी.
संजय बेले, संत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाट