चार नगरपंचायतींच्या प्रभागासाठी आरक्षण सोडत
By admin | Published: August 21, 2015 12:51 AM2015-08-21T00:51:07+5:302015-08-21T00:51:07+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०१५ स्थापित चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ प्रभागासाठी गुरुवारी बचत भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली.
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०१५ स्थापित चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ प्रभागासाठी गुरुवारी बचत भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. २४ आॅगष्टला ही यादी मतदारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यावर ३१ आॅगष्टपर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ४ सप्टेंबरला सुनावनी झाल्यावर जिल्हाधिकारी ९ सप्टेंबरला अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी गजानन बावने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरविकास) ए.जी. तडवी तसेच तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतीचे प्रशासक तसेच या नगरातील नागरीक यांच्या उपस्थितीत बचत भवनात ही सोडत काढण्यात आली.
यामध्ये भातकुली नगर पंचायतीच्या वार्ड क्र.१ मध्ये ्नुजाती, २ ना.मा.प्र. स्त्री राखीव, ३ नामाप्र, ४ सर्वसाधारण स्त्री राखीव, ५ सर्वसाधारण स्त्री राखीव, ६ सर्वसाधारण, ७ सर्व साधारण, ८ अनु. जमाती स्त्री, ९ नामाप्र स्त्री, १४ नामाप्र स्त्री, १५ अनु.जाती, १६ नामाप्र, १७ अनु. जाती स्त्री राखीव आहे.
नांदगांव खंडेश्वर नगर पंचायतीच्या वार्ड क्र. १ मध्ये नामाप्र स्त्री, २ मध्ये सर्वसाधारण, ३ नामाप्र, ४ अनु. जमाती स्त्री, ५ सर्वसाधारण, ६ नामाप्र स्त्री, ७ सर्वसाधारण स्त्री, ८ अनु. जमाती स्त्री, ९ सर्वसाधारण, १० सर्व साधारण स्त्री, ११. नामाप्र स्त्री, १२. अनु. जाती, १३ सर्व साधारण स्त्री, १४ सर्व साधारण, १५ अनु. जाती स्त्री, १६ सर्वसाधारण, १७ मध्ये नामाप्र आरक्षण आहे.
तिवसा नगर पंचायतमध्ये वार्ड क्र.१ अनु. जाती, २ सर्वसाधारण ३. अनु. जाती स्त्री, ४. अनु. जमाती स्त्री, ५. सर्वसाधारण स्त्री, ६. नामाप्र, ७. सर्वसाधारण, ८. अनु. जाती स्त्री, ९. नामाप्र स्त्री, १०. नामाप्र स्त्री, ११. सर्वसाधारण, १२, अनु जाती, १३ नामाप्र, १४ नामाप्र स्त्री, १५ सर्वसाधारण स्त्री, १६ सर्वसाधारण स्त्री, १७ मध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे.
धारणी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.१ मध्ये अनु.जमाती आरक्षण आहे. २ मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, ३ सर्वसाधारण, ४ अनु. जाती, ५ अनु जाती स्त्री, ६ अनुसूचित जमाती, ७ अनु जमाती स्त्री, ८ नामाप्र स्त्री, ९. नामाप्र स्त्री, १० सर्व साधारण, ११ नामाप्र स्त्री, १२ सर्वसाधारण, १३ सर्वसाधारण स्त्री, १४. नामाप्र, १५ नामाप्र १६ नामाप्र स्त्री व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण स्त्री आरक्षण आहे. (प्रतिनिधी)