पंचतारांकित हॉटेल सोडून बच्चू कडू चहा टपरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 08:41 PM2022-06-20T20:41:33+5:302022-06-20T20:42:00+5:30

Amravati News राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे रविवारी मुंबईच्या पवई येथील एका चहा टपरीवर चहा पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leaving the five-star hotel, Bachchu Kadu on a tea stall | पंचतारांकित हॉटेल सोडून बच्चू कडू चहा टपरीवर

पंचतारांकित हॉटेल सोडून बच्चू कडू चहा टपरीवर

googlenewsNext
ठळक मुद्देविधानपरिषद निवडणूक, महाविकास आघाडीलाच मतदान करण्याची ग्वाही 

अमरावती : सोमवार, २० जून रोजी विधान परिषद निवडणूक होत आहे. त्यानुसार आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसह भाजपकडून वारेमाप पैसा खर्च करण्यात येत आहे. मात्र, राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे रविवारी मुंबईच्या पवई येथील एका चहा टपरीवर चहा पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मंत्री, आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये तर बच्चू कडू चहा टपरीवर अशी जोरदार चर्चा रंगली. 

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगला होत आहे. आमदारांची विशेष बडदास्त ठेवली जात असून त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित अशा 'द रिट्रीट' आणि 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, सर्वपक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना मात्र जमिनीवर राहून काम करणारे आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू  बिनधास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवर जाऊन अगदी सामान्यसारखे त्यांनी चहा, बिस्कीटवर ताव मारला. बच्चू कडू यांनी मंत्री पदाचा कोणताही बडेजाव न आणता आजही मी जमिनीवर आहेत, हे सिद्ध त्यानी सिद्ध केले. दुसरीकडे सर्व आमदार हॉटेलमध्ये असताना बच्चू कडू मात्र बिनधास्त आहेत.

 राज्यसभा निवडणूकीत देखील बच्चू कडू हे कोणत्याही हॉटेल मध्ये गेले नव्हते. अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी बच्चू कडू मुंबईत पोहोचले होते, टपरीवर चहा, बिस्किटे खातानाचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मात्र, आपण महाविकास आघाडीलाच मतदान करणार, असे ना. बच्चू कडू यांनी सांगितले.

Web Title: Leaving the five-star hotel, Bachchu Kadu on a tea stall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.