महापालिका शाळेतून एलईडी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:51+5:302021-05-25T04:13:51+5:30

अमरावती : नागपुरी गेट हद्दीतील महापालिकेच्या हिन्दी शाळा क्रमांक २ मधून चोराने पाच हजार रुपयांचा एलईडी टीव्ही चोरून नेला. ...

LED lamps from municipal school | महापालिका शाळेतून एलईडी लंपास

महापालिका शाळेतून एलईडी लंपास

googlenewsNext

अमरावती : नागपुरी गेट हद्दीतील महापालिकेच्या हिन्दी शाळा क्रमांक २ मधून चोराने पाच हजार रुपयांचा एलईडी टीव्ही चोरून नेला. ही घटना रविवारी उघडकीस आली. महिला मुख्याध्यापक यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

000000000000000000000000000000

कैकशा कॉलनीत घरफोडी

अमरावती : नागपुरी गेट हद्दीतील कैकशा कॉलनीत रविवारी घरफोडीची घटना उघडकीस आली. अब्दुल मतीन अब्दुल गणी (३५ रा. कैकशा कॉलनी) हे कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान चोराने दाराचे कुलूप तोडून घरातील ३० हजार रुपयांची रोख लंपास केली. अब्दुल मतीन यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञातविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------------------------

तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

अमरावती : शहर पोलिसांनी विविध ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकून तीन दारू विक्रेत्यांना अटक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगरातील रहिवासी गणेश किसन लादे (४३) याच्याकडून ५४० रुपयांची दारू जप्त केली. बडनेरा पोलिसांनी आठवडी बाजारात धाड टाकून रंजीत गोवर्धन मनवर (३२ रा. इंदिरानगर) याच्याकडून पाचशे रुपयांची गावठी दारू जप्त केली. नांदगाव पेठ पोलिसांनी कशमिरा विनोद भोसले (२५ रा. पिपंळझिरा) याच्या ताब्यातून पाचशे रुपयांची गावठी दारू जप्त केली.

Web Title: LED lamps from municipal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.