डाव्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:06 PM2017-11-08T23:06:09+5:302017-11-08T23:06:22+5:30
नोटाबंदीबच्या वर्षपूर्तीनिमित्त डाव्या आघाडीने बुधवारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोटाबंदीबच्या वर्षपूर्तीनिमित्त डाव्या आघाडीने बुधवारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. या घटनेला बुधवारी एक वर्ष झाले. भाजप सरकारने घेतलेल्या या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नरेंद्र मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर निवेदनाव्दारे केली. यावेळी तुकाराम भस्मे, उदयन शर्मा, अशोक सोनारकर, सुभाष पांडे, सुनील मेटकर, बी.के.जाधव, रमेश सोनुले, जे.एम. कोठारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघाची निदर्शने
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेसह सर्व घटक अडचणीत आले आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचा भारिप बहूजन महासंघाने निषेध केला आहे. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, बाबाराव गायकवाड, रामभाऊ पाटील, अनिल बरडे, मिलिंद डोंगरे, साहेबराव वाकपांजर, चरणदास निकोसे, अशोक गोंडाणे, रंजना इंगळे,अनिल मोहोड आदी उपस्थित होते.