कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:06 PM2018-05-31T20:06:26+5:302018-05-31T20:06:26+5:30

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत कु-हा बिटमधील मौजा राहिमाबाद शिवारात शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आला.

The leopard was found in a dry well in the dead | कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला

कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला

Next

रितेश नारळे
अमरावती : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत कु-हा बिटमधील मौजा राहिमाबाद शिवारात शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागाने बिबट्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मौजा राहिमाबाद गट सर्व्हे क्र. ६९ मधील जगन्नाथ जागळे (रा. कु-हा) यांच्या शेतातील कच्चे बांधकाम केलेल्या कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला. तो अंदाजे ४ वर्षांचा आहे.

ही विहीर जास्त खोल नसून बिबट सहजतेने उडी घेऊन बाहेर निघू शकला असता, ही विहिरींची स्थिती आहे. त्यामुळे हा बिबट मारला की नैसर्गिक मृत्यू झाला, याबाबत वनविभाग संभ्रमात आहे. मृत बिबटाच्या एकूणच स्थितीवरून आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान घटनास्थळी आकोट येथील वन्य जीव विभागाचे श्वान पथक व वन्यजीवतज्ज्ञ वनरक्षक आतिफ हुसेन यांनी घटनास्थळ पिंजून काढले. वनकर्मचाऱ्यांनी विहिरीतून बिबटाला बाहेर काढले व नंतर पशुवैद्यकीय अधिकारी मांजरे, पावडे यांनी घटनास्थळी विच्छेदन केले. त्यानंतर मौजा राहिमाबाद शेतशिवारात त्याला भडाग्नी दिला. बिबटाच्या मृत्यूबाबत संशय आल्यामुळे त्याचे तपास कार्य वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविला असून, घटनास्थळी उपवनसंरक्षक हेमंत मीणा, सहायक वनसरंक्षक अशोक कविटकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर आदींनी भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.

१५ दिवसांत दुसरी घटना
रहिमाबाद शिवारात १५ दिवसांपूर्वी आधी शेतकरी बंगरे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या शिकारीच्या शोधात आला असता, विहिरीत पडला होता. त्याला शर्तीच्या प्रयत्नानंतर वनकर्मचाºयांनी बाहेर काढले. त्यानंतर आज ही घटना घडली. मात्र, या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाला.

Web Title: The leopard was found in a dry well in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.