पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:19 PM2019-07-13T12:19:05+5:302019-07-13T12:27:49+5:30

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे.

Less than 50 percent of rainfall in 22 talukas of western Vidarbha | पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

Next
ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला.

इंदल चव्हाण

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख लाभलेल्या या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा १ जून ते सप्टेंबरपर्यंत अपेक्षित ७७७.९ मिमीच्या तुलनेत १२ जुलैपर्यंत सरासरी २५१.४ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ आहे. वार्षिक २२.१ टक्केवारी आहे. यात अमरावती जिल्ह्यात सरासरी २५३ मिमीपैकी १५७ मिमी, अकोला २२४.८ पैकी १७५.५ मिमी, यवतमाळ २९५.१ पैकी १२६.५ मिमी, बुलडाणा २२०.४ पैकी २१४.३ मिमी, वाशीम २६३.९ पैकी १५९.५ मिलीमीटरच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ इतकी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याने सरासरी गाठली असून, १४ पैकी सात तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांवर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यांनी सरासरी गाठली असून, एकूण सातपैकी सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी एकाही तालुक्याने सरासरी गाठली नसून, केवळ चार तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मानोरा माघारला असून, सर्व तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याची टक्केवारी ६०.४ एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असून सात तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची टक्केवारी ९७.२ इतकी आहे.

विभागातील 'या' तालुक्यांत अल्प पावसाची नोंद

तालुके          मिमी पाऊस       टक्के

भातकुली           ९४.८             ३९ 
तिवसा               ११८.४           ४९.५
मोर्शी                 १२१,१           ४८.३
वरूड               १०३.५           ३५.९
दर्यापूर              ९७.९            ४५.८
अंजनगाव सुर्जी    ८५.४         ४६.३
मूर्तिजापूर          ८५.८           ३४.८
यवतमाळ          ९४.७           ३१
बाभूळगाव        ११.४             ३६.५
कळंब             १०३.३            ३३.८
दारव्हा            ११७.५           ४२.८
दिग्रस             १००                ३५.८
पुसद              १३२.२            ४९.६
उमरखेड       १००.४            ३४.२
महागाव         १०३.६            ३७.८
केळापूर         ११६.१            ३७.३
घाटंजी           १३५.९           ४३
राळेगाव        १४५.६           ४६.१
झरी जामणी  १३१.८             ४१.९
मानोरा          १२६.१             ४९.७
देऊळगाव राजा    ११०.२      ४७.६

आपत्तीजनक स्थितीत शेतकऱ्यांना मदतीवर मंथन  

विभागातील काही तालुक्यांची पावसाची स्थिती बिकट आहे. याबाबत प्रशासन दखलपात्र असून, अवघ्या आठ दिवसांत पावसाची स्थितीत सुधारणा न झाल्यास उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी यथोचित मदत करण्यात येईल. उपलब्ध पाणीसाठ्याचे देखील नियोजनावर मंथन केले जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

Web Title: Less than 50 percent of rainfall in 22 talukas of western Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.