परतवाड्याच्या सखींनी घेतले पाकशास्त्राचे धडे

By admin | Published: February 17, 2016 12:08 AM2016-02-17T00:08:59+5:302016-02-17T00:08:59+5:30

परतवाड्यातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी सखीमंच व शिव इलेक्ट्रॉनिक्सच्या संयुक्त विद्यमाने पाक कार्यशाळा रविवारी घेण्यात आली.

Lessons from the backyard robes | परतवाड्याच्या सखींनी घेतले पाकशास्त्राचे धडे

परतवाड्याच्या सखींनी घेतले पाकशास्त्राचे धडे

Next

कार्यशाळा : शिव इलेक्ट्रॉनिक्स, लोकमत सखी मंचचे आयोजन
अमरावती : परतवाड्यातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी सखीमंच व शिव इलेक्ट्रॉनिक्सच्या संयुक्त विद्यमाने पाक कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. यावेळी सखींनी पाकशास्त्राचे धडे गिरवले.
या कार्यशाळेत सखींना ढोकळा, उपमा, पिझ्झा, खीर, केक, पुलाव, नान या सर्व पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षिका म्हणून जयम पटेल या उपस्थित होत्या. उपस्थित सखींना यावेळी जयम पटेल यांनी प्रश्न विचारले. अचूक उत्तरे देणाऱ्या सखींना बक्षिसेही देण्यात आलीत. कार्यक्रमात शिव इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल लाईन परतवाड्याच्या संचालिका विद्या कराळे यांच्याकडून सखींना 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून विविध बक्षिसेदेखील देण्यात आलीत. लकी ड्रॉमध्ये राईस कुकर, ब्लेंडर, चॉकर, मायक्रोव्हेव्ह पॉट अशी बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. राशी पटेल, भालेराव, नम्रता पेटे, योगिता पोपली, वाटाणे, मुग्धा काळे या महिलांनी लकी ड्रॉ जिंकला.
संचालन योगिता पोपली तर आभार प्रदर्शन अपर्णा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात सखींनी प्रशिक्षकांना विविध प्रश्न विचारून आपले पाककौशल्याचे धडे घेतले. कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी पल्लवी धर्माधिकारी, तारकेश्वरी चिखले, नेहा अविनाशे, कांचन पाटील, माधुरी देशमुख, प्रीती क्षीरसागर, संयुक्ता देशपांडे, शीतल डोंगरे, निलजा मुंदाने, कनक बैस, अलका गावंडे आदींनी प्रयत्न केलेत. यावेळी लोकमत सखी मंच सदस्यता नोंदणीसाठी सन २०१६ चे फॉर्म वितरित करण्यात आले.

Web Title: Lessons from the backyard robes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.