केंद्रीय पथकाने दिले विद्यार्थ्यांना शहर स्वच्छतेचे धडे

By admin | Published: January 19, 2017 12:12 AM2017-01-19T00:12:41+5:302017-01-19T00:12:41+5:30

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने ...

The lessons of city cleanliness by the central team led to the students | केंद्रीय पथकाने दिले विद्यार्थ्यांना शहर स्वच्छतेचे धडे

केंद्रीय पथकाने दिले विद्यार्थ्यांना शहर स्वच्छतेचे धडे

Next

स्वच्छ सर्वेक्षण : २००० गुणांच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस
अमरावती : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी ज्ञानमाता आणि मनीबाई गुजराती विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्याना शहर स्वच्छतेचे धडे दिले.
क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे तीन सदस्यीय तपासणी पथक मंगळवार १७ जानेवारीला महापालिकेत दाखल झाले. स्वच्छ भारत अभियानाचे चिफ आॅफिसर चारुदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांचा या पथकात समावेश आहे.
२००० गुणांच्या या परिक्षेला सामोरी जाताना पालिका प्रशासनाने भक्कम तयारी केली आहे. चारुदत्त पाठक यांनी सोमवार पाठोपाठ मंगळवारीही सभागृहात बसून महापालिकेचे डॉक्यूमेंटेशनची तपासणी केली. स्वच्छता,कचरा वाहतूक, साफसफाई कंत्राट, कचरा संकलन आणि घनकचरा व्यवस्थापनासह अन्य स्वच्छतेविषयीचे सर्व आवश्यक कागदपत्रांची पाठक यांनी बारकाईने पडताळणी केली. महापालिकेने सादर केलेल्या डॉक्युमेंटेशनवर पाठक यांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे पाठक यांनाही प्रत्येक बाबीचा आॅनलाईन अहवाल केंद्रीय पथकाला पाठविणे अनिवार्य असल्याने पडताळणीला वेग आला आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी आवश्यक ती पुर्वतयारी आणि इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत डॉक्युमेंट तयार केल्याने त्यासाठीही असलेल्या गुणांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.शहर स्वच्छता आणि उच्च न्यायालयाचे निर्देश पाळून महापालिकेने हाती घेतलेल्या प्रक्रिया प्रकल्पाचा कारवाई अहवालही क्युसीआय पथकासमोर ठेवण्यात आला.

विद्यार्थ्यांशी संवाद
केंद्रीय पथकातील विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशी सुध्दा शहरातील स्वच्छतेची आॅन द स्पॉट पाहणी केली.सकाळच्या सत्रात उभय अधिकाऱ्यांनी ज्ञानमाता विद्यालयात जावून तेथिल विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शहर स्वच्छतेच्या उपयुक्त टिप्स देउन विद्यार्थी हे प्रभावी मेसेंजर असल्याने त्यांचे प्रबोधन करण्यात आले.त्यांचेकडून शहर स्वच्छतेची माहितीही जाणून घेण्यात आली.वैयक्तिक शौचालयाची उभारणी कसी अनिवार्य आणि आरोग्य संवर्धक आहे,हे या विद्यार्थ्याना प्रभावीपणे सांगण्यात आले.

Web Title: The lessons of city cleanliness by the central team led to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.