मेळघाटातील पुनर्वसित आदिवासींना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:50+5:302021-02-15T04:12:50+5:30
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील पिली गावचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील मोचखेडा व टोंगलापूर येथे झाले ...
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील पिली गावचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील मोचखेडा व टोंगलापूर येथे झाले आहे. सदर पुनर्वसित गावातील नागरिकांना रोजगार तसेच वित्तीय साक्षरता आणि व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
व्यसनमुक्ती या विषयावर क्षेत्रीय समन्वयक अधिकारी प्रतिभा गजभिये यांनी बुधवारी मार्गदर्शन केले. ११ फेब्रुवारी रोजी सिपना वन्यजीव विभाग व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान पुनर्वसनाच्या लाभातून मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक आणि त्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक झा, सहायक वनसंरक्षक के.एस. पाटील व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र इवनाते उपस्थित होते.
----------------------------