चांदूरबाजारात रस्ता सुरक्षा नियमांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:41+5:302021-02-10T04:13:41+5:30
पान ३ चांदूर बाजार : स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, ग्रामीण रुग्णालय व ...
पान ३
चांदूर बाजार : स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, ग्रामीण रुग्णालय व पोलीस व वाहतूक प्रशासन, चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन तसेच रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
८ फेब्रुवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत चांदूर बाजार शहरातील चौकात वाहतूक नियमांचे लोकांनी पालन करण्याकरिता पथनाट्य सादर करून व गीताद्वारे जनजागृती करण्यात आली. टोम्पे महाविद्यालयापासून निघालेली रॅली शिवाजी महाराज चौक, पोलीस स्टेशन, बस स्टँड, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, बेलोरा स्टॉप मार्गे जात पोलीस ठाण्याचा आवरात समारोप झाला. रॅलीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुनील किनगे, प्राचार्य राजेंद्र रामटेके, मंगेश अडगोकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रफुल्ल चौधरी, निधी दीक्षित, राजेश्री अतकरे यांनी केले. यावेळी सहायक पुलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन केले.
-------