'ट्रॅफिक सेन्स'चे विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:49 PM2019-01-05T22:49:50+5:302019-01-05T22:50:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी ट्रॅफिक सेन्स उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती सजगता निर्माण करणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी ट्रॅफिक सेन्स उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती सजगता निर्माण करणारी ठरणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित रेझिंंग डे'निमित्त शनिवारी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये २५ ते ३० शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
५ जानेवारी रोजी पोलीस ध्वज दिवस (रेझिंग डे) निमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळा-महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पोलीस विभागाच्या कार्यप्रमाणीलीचे धडे घेतले. दहशतवाद्यांसोबत लढा, सायबर क्राईम, शस्त्र प्रदर्शन, वायरलेस विभागाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाच्या कामाकाजाचा आढावा घेत रेझिंग डे साजरा केला. यावेळी वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमन व नियंत्रणासाठी कशी उपाययोजना केली जाते, याबाबत शाळकरी विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिकांना मार्गदर्शन केले. पोलिसांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व उत्साहाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्तांसह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शाळा, महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिकांचा सहभाग होता.