चला ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सामील होऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 05:00 AM2021-07-01T05:00:00+5:302021-07-01T05:00:38+5:30

रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने  स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दरम्यान अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोेहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया, असे आवाहन खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.  

Let's join Lokmat's Blood Donation Mahayagna ... | चला ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सामील होऊया...

चला ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सामील होऊया...

Next
ठळक मुद्देखासदार, आमदार, अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, भविष्यासाठी ठरणार लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. हा काळ मोठे आव्हान देणारा ठरला. या काळात विशेषत: रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने  स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दरम्यान अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोेहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया, असे आवाहन खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.  मान्यवरांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. 
यावेळी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, लोकमतचा उपक्रम स्तुत्य आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढता येईल. आमदार सुलभा खोडके यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला हातभार लावणारा उपक्रम हाती घेतल्याने ‘लाेकमत’चे अभिनंदन केले. या उपक्रमाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी कोरोना काळात प्रत्येकाला रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार राणा यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. लोकमतने सुरू केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे त्या म्हणाल्या. 

 

Web Title: Let's join Lokmat's Blood Donation Mahayagna ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.