लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:03+5:302021-06-10T04:10:03+5:30

कालबाह्य झालेल्या लायसन्ससाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ : संदीप मानकर - अमरावती : लॉकडाऊन काळात आरटीओचे लायसन्स, नवीन ...

License expired, have you made an appointment? | लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?

लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?

Next

कालबाह्य झालेल्या लायसन्ससाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ :

संदीप मानकर - अमरावती : लॉकडाऊन काळात आरटीओचे लायसन्स, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशनचे कामकाज बंद होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या कायमस्वरूपी लायसन्सची मुदत संपली असण्याची शक्यता आहे. मात्र, अशांनी घाबरून जाण्याचे काहीही गरज नाही. कारण शासनाच्या निर्देशानुसार त्याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लायसन्सचे नूतनीकरण करायचे असेल, तर ३० जूनपूर्वी शासनाच्या ‘सारथी’ पोर्टलवर जाऊन त्यांना अपॉईंटमेंट घ्यावी लागणार असल्याचे एआरटीओ सिद्धार्थ ठोके यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्याकरिता सद्यस्थितीत दुचाकी, चारचाकीच्या शिकाऊ (लर्निंग लायसन्स) च्या अपॉईंटमेंट रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन आदेश येईपर्यंत लर्निंग लायसन्सची अपॉईंटमेंट किंवा टेस्ट होणार नसल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरी गत तीन दिवसांपासून आरटीओच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत कामकाज सुरू आहे. नागरिकांना मुदत वाढविल्याची माहिती नसल्यामुळे शिकाऊ वाहन परवाना काढण्याकरिता वाहनचालकांची गर्दी वाढली आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांचे शो-रूम उघडल्यामुळे दीड महिन्यापासून ठप्प असलेल्या वाहन खरेदीकडेसुद्धा नागरिकांनी धाव घेतली असून, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन आरटीओकडे होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स:

अशी घ्या अपॉइंटमेंट

शासनाच्या ‘सारथी’ पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्यात नमूद माहिती भरून व कागदपत्रे अपलोड करून लर्निंग लायसन्स किंवा मुदत संपलेल्या परमनन्ट लायसन्सच्या नूतनीकरणाकरिता अपॉईंटमेंट घ्यावी लागते. बरेच नागरिक एजंटकडून ही अपॉईंटमेंट मिळवितात. मात्र, घरी बसूनही शासनाच्या नियमानुसार डेबीट कार्ड किंवा नियमानुसार ऑनलाईन शुल्काचा भरणा करून आरटीओच्या टेस्टकरिता अपॉईंटमेंट घेता येत असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स:

असा आहे कोटा

कोरोनामुळे आरटीओतील गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोणातून लर्निंग लायसन्ससाठीच्या नवीन अपॉईंटमेंट बंद ठेवण्यात आल्या आहेत. लर्निंग लायसन्सकरिता पूर्वी २०० जणांना प्रतिदिन अपॉईंटमेंट देवून त्यांची टेस्ट घेण्यात येत होती. मात्र, लायसन्स नूतनीकरणासाठी ज्यांनी अपॉईंटमेंट घेतली आहे, असे ८० ते ९० जण आरटीओमध्ये रोज येत आहेत. गर्दी टाळण्याकरिता ज्यांच्या कायमस्वरूपी लायसन्सची मुदत संपली, त्यांना ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बॉक्स:

पहिल्या तीन दिवसांत ३४९ वाहनांची नोंदणी

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, गत दीड महिन्यांपासून कडक निर्बंधासह संचारबंदी होती. त्यामुळे शो-रूम बंद होते. मात्र, ६ जूननंतर निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने दुचाकी-चारचाकी वाहनांच्या खरेदीकरिता नागरिकांनी धाव घेतली असून, पहिल्या तीन दिवसांत ३४९ नवीन वाहनांची नोंदणी आरटीओकडे आली. त्यापैकी २८९ दुचाकी व ६० चारचाकी वाहनांची नोंदणी आरटीओकडे झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांनी सांगितले.

कोट

कोरोनाची गर्दी टाळण्याकरिता पुढील आदेशापर्यंत लर्निंग लायसन्सच्या अपॉइंटमेंट किंवा टेस्ट घेणे बंद आहे. ज्यांच्या लायसन्सची मुदत संपली आहे, त्यांना शासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, पुढील तारखेसाठी त्यांनी ३० जूनपर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी.

सिद्धार्थ ठोके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (लायसन्स)

Web Title: License expired, have you made an appointment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.