कपाशीच्या एका वाणासाठी दुसऱ्याचे लिकिंग; विक्रेत्यांचा फंडा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 20, 2023 05:40 PM2023-06-20T17:40:37+5:302023-06-20T17:41:07+5:30
‘त्या’ वाणांचा पुरवठा कमी झाल्याने प्रकाराला खतपाणी
अमरावती : हायब्रीड कपाशीच्या विशिष्ट दोन विशिष्ट वाणांची मागणी बियाणे बाजारात वाढताच त्याचा तुटवडा असल्याचे सांगून विक्रेत्यांद्वारा लिंकिंगला खतपाणी दिल्या जात आहे. या वाणाच्या बियाण्यांसोबत कपाशीच्या अन्य वाणाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असल्याचे वास्तव आहे.
वास्तविकता कपाशीच्या सर्व हायब्रीड बियाण्यांमध्ये उत्पादकता सारखीच असताना शेतकऱ्यांद्वारा दोन विशिष्ट वाणांची मागणी जिल्ह्यात वाढत आहे. या बियाण्यांची मागणी अन्य जिल्ह्यातही असल्याने पुरेसा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची पाच पाकिटांची मागणी असेल तर दोन त्याच्या मागणीची पाकिटे दिली जातात तर तीन पाकिटे अन्य कंपन्यांची दिले जात असल्याचे वास्तव आहे.