याला जीवन ऐसे नाव!
By Admin | Published: February 15, 2016 12:51 AM2016-02-15T00:51:33+5:302016-02-15T00:51:33+5:30
रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत.
संदीप मानकर अमरावती
रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत. शहरीकरणाच्या जीवनशैलीपासून व सुखसुविधेपासून कोसोदूर असलेले हे आदिवासी कुटुंब मिळेल तेथे निवारा शोधून जीवन जगत आहे. यालाच जीवन म्हणायचे का, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम जरिदा, चुर्णी, काटपूर परिसरातील १० ते १५ कुटुंब राजापेठ परिसरातील इलेक्ट्रीकचे केबल टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. वडाळीच्या बांबू केंद्राच्या गेटजवळ त्यांनी निवारा शोधला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तात्पुरत्या पालाचे घर बांधलेले व तेथे राहत असलेले देवीदास अखंडे व संजू मावस्कर यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात श्रीमंती जाणवत होती. भविष्याची चिंता नाही, गेलेल्या वेळेची फिकीर नाही. ते सांगतात बस २०० ते ३०० रुपये रोज कमवाला व दिवस भागला व पोटाची खळगी भरली की संपले जीवन. देवीदासला एक मुलगी दोन मुले, स्थलांतरित झाल्यामुळे शिक्षण, आरोग्याची सोय नाही. बाहेरुन पाणी आणावे लागते. ज्या ठिकाणी ते राहतात, तेथे सर्पदंश किंवा इतर प्राण्यांचा भय मनात नाही. चूल पेटवून दोन घास खाण्याचे व दोन्ही टाईम दिवसभर कामावर जायचे येथे पालाच्या घरात १५ कुटुंब असेच जीवन जगत आहेत. शासनाने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लाख प्रयत्न सुरू आहे. पण पदरी मात्र अपयशच! साहब, जंगल मे सोना है, इसमेही पुरी जिंदगी निकल गई. उपरवाला साथ मे है, असे स्मितहास्य देत, पोटासाठी जगावे लागते, असे म्हणतात. मेळघाटात शासनाच्या सुविधा मिळत नाही, रोजगारपण नाही, बँकेत खाते काढण्यासाठी चप्पल घासावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात एकांतवासाने हे जीवन जगत.