पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:12 PM2018-02-09T21:12:03+5:302018-02-09T21:12:20+5:30
पत्नीची जाळून हत्या क रणाºया पतीस स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश भांदुजी धुर्वे (३५, कळमगव्हाण) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
अमरावती - पत्नीची जाळून हत्या क रणाºया पतीस स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश भांदुजी धुर्वे (३५, कळमगव्हाण) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक २ च्या न्यायधीशांनी पाच साक्षीदार तपासून आरोपीला जन्मठेप, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
कळमगव्हाण येथे २९ जानेवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती. आरोपी नरेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. सकाळच्या सुमारास पीडिता ही आरोपीकरिता चहा घेऊन गेली असता, त्याने तिच्या अंगावर घासलेट टाकून तिला पेटवून दिले. तिच्या मृत्युपूर्व बयानावरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्याने कलम ३०२ नव्याने समाविष्ट करण्यात आले. न्यायलयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.
जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे नरेश धुर्वे याला दोषी ठरविले व जन्मठेप सुनावली. सरकारी पक्षातर्फे परीक्षित गणोरकर यांनी युक्तिवाद केला. जमादार संतोष चव्हाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.