चाकावरचं आयुष्य अद्यापही अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:14 PM2018-05-27T23:14:58+5:302018-05-27T23:15:17+5:30

हाथ साबूत पण चालता येत नाही़ दररोज आपली दिनचऱ्या पूर्ण सांभाळत येणाºया प्रत्येक दिवसाचे स्वागत चाकावरच्या आयुष्यावर काढण्याचे बळ मागील ३० वर्षांपासून मिळत असले तरी लालफीतशाईच्या दुर्लक्षामुळे हतबल होण्याची वेळ तिच्यावर आली आहे़

The life of the wheel is still over | चाकावरचं आयुष्य अद्यापही अधांतरी

चाकावरचं आयुष्य अद्यापही अधांतरी

googlenewsNext
ठळक मुद्देएक संघर्ष : लालफीतशाई गांधारीच्या भूमिकेत

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : हाथ साबूत पण चालता येत नाही़ दररोज आपली दिनचऱ्या पूर्ण सांभाळत येणाºया प्रत्येक दिवसाचे स्वागत चाकावरच्या आयुष्यावर काढण्याचे बळ मागील ३० वर्षांपासून मिळत असले तरी लालफीतशाईच्या दुर्लक्षामुळे हतबल होण्याची वेळ तिच्यावर आली आहे़
तालुक्यातील जुना धामणगाव हे सात हजार लोकवस्तीचे गाव. येथील सुरेखा ज्ञानेश्वर बोरकर हिची संघर्षाची गाथा अनेकांच्या डोळ्यात अश्रु आणणारी आहे़ सुरेखा दोन वर्षांची असताना तिला पायाने चालता येत नसल्याचे जन्मदात्याच्या लक्षात आल़ तेव्हापासून ३० वर्षे तिला दुरुस्त करण्याची जन्मदात्याची जगावेगळी धडपड सुरू आहे़
केवळ पायाच्या टाचेचा आजार
लहाणपणी चालता येत नसल्याने वडिलांनी नागपूर येथे शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले़ तद्नंतर एकापेक्षा एक मोठ्या रूग्णालयात तिच्या पायाच्या उपचारासाठी धडपड सुरू आहे़ केवळ पायाच्या टाचेचा आजार असल्याने अद्यापपर्यंत महागडा उपचार पैशाअभावी झाला नसल्याचे हातावर आणून पानावर खाणाऱ्या सुरेखाच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले़
हवाय आधार : सुरेखा ही अत्यंत हुशार व कर्तबगार मुलगी आहे़ गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर येथीलच अशोक विद्यालयात इयत्ता दहावीपर्यंत तिचे शिक्षण पूर्ण झाले़ पुढील शिक्षणासाठी कोणताही आधार मिळाला नाही़ ती स्वत: आपली दैनंदिन कामे आटपून वृत्तपत्र वाचणे, अनेक लेखकांच्या कथा व पुस्तके वाचण्याचा छंद तिने जोपासला आहे़
प्रशासन कधी देणार लक्ष?
राज्य व केंद्र शासनाच्या दिव्यांगांकरिता अनेक योजना आहेत़ मात्र, सुरेखाला केवळ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सहाशे रूपये अनुदान मिळते़ प्रशासनाने आपल्याकडे लक्ष द्यावे, अशी कैफियत तिने मांडली़

Web Title: The life of the wheel is still over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.