दोन ठिकाणी कोसळली वीज

By admin | Published: September 9, 2015 12:17 AM2015-09-09T00:17:37+5:302015-09-09T00:17:37+5:30

तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. या वर्षातील पावसाळ्याचा हा अतिशय वेगवान पाऊस ठरला.

Lightning damaged in two places | दोन ठिकाणी कोसळली वीज

दोन ठिकाणी कोसळली वीज

Next

जीवहानी नाही : बडनेऱ्यात नारळाच्या झाडावर, करजगावात टॉवरवर
चांदूरबाजार : तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. या वर्षातील पावसाळ्याचा हा अतिशय वेगवान पाऊस ठरला.
या पावसाची तालुक्यातील करजगाव मंडळात अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. येथे ७० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील सात मंडळांत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार, तालुक्यात पडलेल्या पावसाची या दिवसाची सरासरी २२.७४ मि.मी. एवढी नोंदविण्यात आली आहे.
शहरातही सायंकाळच्या सुमारास काही काळाकरिता गंभीर स्थिती निर्माण झाली होती. तासभर दणकेबाज पावसाने व विजांच्या कडकडाटांनी शहरातील नागरिकांना अक्षरश: वेठीस धरले होते. महसूलच्या स्थानिक नोंदीनुसार शहरात ३४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी सखल भागात पाणी तुंबल्याची माहिती प्राप्त झाली.
तासभर विजांच्या आवाजाने शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला होता. अशात वीज कोसळल्याने प्रचंड आवाज झाला. त्यामुळे बी.एस.एन.एल.ची फोन सेवा १४ तासांपर्यंत ठप्प पडली होती. ही सेवा मंगळवारी सकाळी १० वाजता पूर्ववत सुरू झाली.
महसूल विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस, चांदूरबाजार ३४ मि. मी., बेलोरा २२ मि.मी., ब्राम्हणवाडा थडी २८ मि. मी., करजगाव ७० मि. मी., आसेगाव ४.२ मि. मी., शिरजगाव कसबा १ मि. मी. तर तळेगाव मोहना मंडळात पावसाची नोंद निरंक आहे. आठ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नोंदीनुसार तालुक्यात यावर्षी सरासरी ५११.७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
याच कालखंडात झालेल्या पावसाची सरासरी पाहता तालुक्यात मागील वर्षीपेक्षा १४२.७३ मि. मी. इतका पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी स्थिती मागील वर्षीच्या दुष्काळापेक्षाही तीव्र असल्याची माहिती शेतकरी वर्गाकडून एकिवात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lightning damaged in two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.