क्रौर्याची परिसीमा; पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून हत्या; अमरावती जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:09 PM2019-08-31T12:09:23+5:302019-08-31T12:11:03+5:30

मद्यधुंद पतीने बेदम मारहाण करताना पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली.

The limits of cruelty; Murder of wood in his wife's genitals; In Amravati district | क्रौर्याची परिसीमा; पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून हत्या; अमरावती जिल्हा

क्रौर्याची परिसीमा; पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून हत्या; अमरावती जिल्हा

Next
ठळक मुद्देपती ताब्यातहनवतखेडा शिवारातील घटना

अमरावती : मद्यधुंद पतीने बेदम मारहाण करताना पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
रुक्मा विष्णू चढोकार (४५, रा. कामिदा, ता. भैसदेही, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे, तर विष्णू तोटा चढोकार (५०) असे तिच्या पतीचे नाव आहे. दोन महिन्यांपासून हे दाम्पत्य दीपेश अग्रवाल यांच्या परतवाडा ते अंजनगाव सुर्जी मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात रखवालदार म्हणून वास्तव्यास होते. विष्णूला दारूचे व्यसन असल्याने दोघांत बाचाबाची होत असे. गुरुवारी परतवाडा येथील आठवडी बाजार करून आल्यानंतर रात्री दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली. वाद विकोपाला गेल्याने विष्णूने मारहाण केली. पत्नी रुक्माच्या गुप्तांगात तेथे पडलेले जळाऊ लाकूड भोसकले. या प्राणांतिक आघाताने तिचा मृत्यू झाला.
नजीकच्या शेतातील रखवालदाराने दीपेश अग्रवाल यांना शुक्रवारी सकाळी माहिती दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परतवाडा पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत दाखल होऊन पंचनामा केला. अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

विष्णू मद्याच्या अंमलातच
पत्नीचा खून करणाऱ्या विष्णू चढोकारला पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतले. गुरुवारच्या बाजारात केलेल्या मद्यपानाचा अंमल त्याच्यावर पोलिसांनी अटकेत घेतानाही कायम होता. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The limits of cruelty; Murder of wood in his wife's genitals; In Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.