जलसंपदा विभागाच्या आवारात दारुच्या बॉटल्स जैसे- थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:40+5:302021-08-17T04:19:40+5:30
अमरावती : येथील जलसंपदा विभागाच्या आवारात रात्री दरम्यान येथेच्छ दारू ढोेसून आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात. यासंदर्भात ...
अमरावती : येथील जलसंपदा विभागाच्या आवारात रात्री दरम्यान येथेच्छ दारू ढोेसून आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात. यासंदर्भात ‘जलसंपदा विभागाच्या आवारात तळीरामांची चंगळ असे वृत्त १५ ऑगस्टच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली. मात्र, परिसरातील दारूच्या रिकाम्या बॉटल्स उचलण्याची तसदी कुणीही घेतली नाही.
सोमवारी दारूच्या रिकाम्या बॉटल्स
येथील परिसरात दोन मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंता, तीन कार्यकारी अभियंता व अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची कार्यालय आहे. त्यामुळे दारूच्या बॉटल्स फेकल्या जात असेल तर आपल्या कार्यालयाचा काय संबंध, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात कोण दारू पितो? कुणी ओल्या पार्ट्या झोडून रिकाम्या बॉटल्स फेकल्या. हा प्रश्न जरी असला तरी स्वतंत्र दिनाला परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी कुठल्याच कार्यालयाने घेतली नाही, हे विशेष! याच ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचा तरी धाक अधिकाऱ्यांना असायला हवा. येथे १३ सुरक्षा रक्षक असून त्यांची प्रत्येक आठ तासाला चार जणांची ड्युटी असते. म्हणजे रात्रीला फक्त चार सुरक्षा रक्षक एवढ्या मोठ्या परिसराची सुरक्षा करतात. वसाहतीतील काही कर्मचारी येथे रात्री दारू पिऊन रिकाम्या बॉटल्स फेकून देत असावे, असा संशय सुरक्षा रक्षकांनी वर्तविला आहे. बाहेरील लोकांचा मुख्य प्रवेशव्दारातून वावर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या ठिकाणी अशाप्रकारचे मद्यपी दारू पीत असतील तर येथे राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे त्या परिसराची तातडीने स्वच्छता करून संबधितांवर सुरक्षा रक्षकांचा वॉच असावा, अशी मागणी होत आहे.
कोट
परिसरातील स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश मी कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. आवारात सुरक्षा रक्षक वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलले जातील.
- अनिल बहादुरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती