एकाच पेल्यातून तळीरामांना दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:01:16+5:30
गावबंदीचे फलक गावोगावी लागले. पण गावातील अथवा परिसरातील तळीरामाला जिल्ह्यात पहिल्यांदा बेदम चोप देण्यात येईल, अशी तंबी वजा इशारा मोझरी गावकऱ्यांनी दिला. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बियर बार, हॉटेल, देशी दारूची अधिकृत दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ग्रामीण भागात अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज (मोझरी) : नशेसाठी वाट्टेल ते किमत चुकविण्यासाठी आज नशाबहाद्दर तयार आहे. त्याचे जिवंत उदाहरण अमरावती, यवतमाळमधील नागपुरी खर्रा. त्यापाठोपाठ आता गावठी दारूची नशा चढू लागली आहे. गावठी दारू देण्यासाठी विक्रेत्यांकडून एकाच ग्लासचा वापर होताना दिसत. त्यामुळे संसर्गाची भीती वाढली आहे. नशेबहाद्दर गाववस्तीत शिवराळ भाषा वापरतात. ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
गावबंदीचे फलक गावोगावी लागले. पण गावातील अथवा परिसरातील तळीरामाला जिल्ह्यात पहिल्यांदा बेदम चोप देण्यात येईल, अशी तंबी वजा इशारा मोझरी गावकऱ्यांनी दिला. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बियर बार, हॉटेल, देशी दारूची अधिकृत दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ग्रामीण भागात अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. अनेक दारूचे दुकान बंद असल्याने मोझरीत दारू पिणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता आंबेडकरनगरात रस्ता बंद करून तळीरामांना इशारा देणारे फलक लावले आहे. कोणी व्यक्ती दारू पिण्यास व अकारण फिरताना दिसल्यास त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा या बॅनरच्या माध्यमातून गावकऱ्यांनी दिला जात आहे.
फलक लक्षवेधी
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अनेक गावांत बाहेर गावातील लोकांना गावबंदी, असे फलक लावण्यात आले आहे. मोझरीत मात्र तळीरामांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी असे फलक लावले आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे.