कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्यही गायब; १३ पेक्षा जास्त तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:54+5:302021-06-10T04:09:54+5:30

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या काळात डॉक्टर, परिचारिका उपचारात व्यस्त होते. मात्र, अटेन्डंट व स्वच्छतेचे ...

Literature also disappeared after the death of the coronaries; More than 13 complaints | कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्यही गायब; १३ पेक्षा जास्त तक्रारी

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्यही गायब; १३ पेक्षा जास्त तक्रारी

Next

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या काळात डॉक्टर, परिचारिका उपचारात व्यस्त होते. मात्र, अटेन्डंट व स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीचे काही कर्मचारी दगावलेल्या रुग्णांचे साहित्य चोरत होते. यासंदर्भात सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास १३ वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसंबंधी सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. परंतु, एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढताच इर्विन, सुपर स्पेशालिटी, कोविड केअर हॉस्पिटलमध्ये असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले होते. सुपर स्पेशालिटीत, तर एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार करण्याची वेळ आली. डॉक्टरांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वच राबत होते. मात्र, रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी व रुग्णांच्या मदतीसाठी नेमलेल्या कंत्राटी कंपनीचे काही कर्मचारी चोरटे निघाले. याचा मनस्ताप मृताच्या नातेवाइकांसोबतच रुग्णालय प्रशासनालाही झाला. या प्रकारच्या इर्विनशी संबंधित चार ते पाच, तर सुपर स्पेशालिटीशी संबंधित सहा ते सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने आपल्या स्तरावर कारवाईकरिता संबंधित नातेवाइकांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते. बॉक्स

बोटातील अंगठीही काढली

सुपर स्पेशालिटीत कोरोना मृताच्या बोटातील सोन्याची अंगठीही चोरल्याचे नातेवाइकाने सांगितले. रुग्णालयातून प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून मृतदेह थेट स्मशानात नेल्यावर तिथे अंत्यसंस्कार करताना आईच्या बोटातील अंगठी गहाळ असल्याचे लक्षात आले. तिचा मोबाईलही मिळाला नाही. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

--------------

बॉक्स

कपडेही सोडले नाही

अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने भावाला नुसत्या वस्त्रांवरच सुपर स्पेशालिटीत भरती केले. दुसऱ्या दिवशी नव्या कपड्यांची बॅग अटेन्डंटकडे सोपविली. तिसऱ्या दिवशी भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या अंगावर जुनेच कपडे होते. नव्या कपड्यांची पिशवी, त्यांचे पैशांचे पाकीट गायब झाले होते. यासंदर्भात रुग्णालयात तक्रार केली असल्याचेही एका नातेवाइकाने सांगितले.

-------------

बॉक्स

एकूण कोरोना रुग्ण -------------

बरे झालेले रुग्ण -------------

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-----------

मृत्यू --------------

Web Title: Literature also disappeared after the death of the coronaries; More than 13 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.