मुंबईत दगावलेल्या चिमुकलीवर धारणीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:49+5:30
धारणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी गणेश प्रेमलाल पुरते यांची सहा वर्षीय चिमुकली अभिच्छा ही तीन-चार महिन्यांपुर्वी घरावरून पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताची गाठ बनली. त्या आॅपरेशनसाठी चिमुकलीला घेऊन तिचे वडील गणेश पुरते, लक्ष्मी पुरते, प्रेमलाल पुरते व शेख सईद शेख हारून (सर्व रा. प्रभाग क्र १२) यांनी रेल्वेने मुंबईस्थित जे.जे. हॉस्पिटल गाठले. होळीपूर्वीच ते तेथे गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : उपचारादरम्यान मुंबईत दगावलेल्या येथील सहा वर्षीय चिमुकलीवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मनामनात कोरोनाची दहशत असल्याने धारणीकरांमध्ये चिंतेचे लके र उमटली. त्याअनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत, मुंबईहून परतलेल्या त्या कुटुंबाला होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या. त्या चिमुकलीचे पार्थिव घेऊन एक रुग्णवाहिका मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे पोहोचली. मुंबई शहर कोरोना संसर्गासाठी हॉटस्पॉट ठरल्याने धारणीकरांच्या काळजाचे ठोके चुकले.
धारणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी गणेश प्रेमलाल पुरते यांची सहा वर्षीय चिमुकली अभिच्छा ही तीन-चार महिन्यांपुर्वी घरावरून पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताची गाठ बनली. त्या आॅपरेशनसाठी चिमुकलीला घेऊन तिचे वडील गणेश पुरते, लक्ष्मी पुरते, प्रेमलाल पुरते व शेख सईद शेख हारून (सर्व रा. प्रभाग क्र १२) यांनी रेल्वेने मुंबईस्थित जे.जे. हॉस्पिटल गाठले. होळीपूर्वीच ते तेथे गेले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करावयाचे असल्याने ते एका रुग्णवाहिकेने मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास धारणी येथे पोहोचले. याबाबत स्थानिक पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला माहिती मिळताच मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तलाठी तायडे, एपीआय अरुण राऊत, अरविंद सरोदे, बाबूलाल जावरकर यांनी मृताचे घर गाठले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना त्या कुटुंबाला देण्यात आल्या. त्यानुसार अंत्यसंस्कार पार पडले.
घर सील; परिसरात सॅनिटायझर फवारणी
मृत सहा वर्षीय चिमुकलीचे धारणी येथील घर सील करण्यात आले. नगरपंचयत प्रशासनाने तो परिसर सॅनिटाईज्ड करवून घेतला. चिमुकलीला उपचाराकरिता मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या तिच्या चार नातेवाइकांची उपजिल्हा रुणालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी केली. त्यांना येथील ज्ञानमंदिर कन्या विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले.