विहिरीत पडलेल्या दोन काळविटांना जीवदान

By Admin | Published: April 6, 2015 12:29 AM2015-04-06T00:29:53+5:302015-04-06T00:29:53+5:30

मंगळवारी रात्री पाण्याच्या शोधात निघालेले दोन मोठे काळवीट विहिरीत पडले.

Lived two blacksmiths lying in the well | विहिरीत पडलेल्या दोन काळविटांना जीवदान

विहिरीत पडलेल्या दोन काळविटांना जीवदान

googlenewsNext

वनकर्मचाऱ्यांचे प्रयत्न : अंबाडा शेतशिवारातील घटना
अचलपूर :
मंगळवारी रात्री पाण्याच्या शोधात निघालेले दोन मोठे काळवीट विहिरीत पडले. वन कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी अथक प्रयत्न करून बुधवारी दुपारी या दोन्ही काळविटांना सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले.
तालुक्यातील अंबाडा (कंडारी) येथील राजेश श्रीराम वाडोकार यांच्या शेतात ही घटना घडली. परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तळेगाव मोहना बिटमध्ये अंबाडा कंडारी या परिक्षेत्राचा समावेश आहे. बहिरमसह मेळघाटचे जंगल लागून आहे. उन्हाळा असल्याने हिरवा चारा व पाण्याच्या शोधात हे तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी शहराकडे भटकतात. दोन्ही काळवीटदेखील अन्न व पाण्याच्या शोधात निघाले असतानाच विहिरीत पडल्याचा कयास व्यक्त होत आहे.
ही बाब बुधवारी सकाळी शेतमालक वाडोकार यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच वनकर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पटगव्हाणकर, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक आठवले, वनरक्षक प्रमोद बरडे, सईद भोवाली, अशोक कराळे आदींनी बुधवारी दुपारी १२.३० वाजता दोराच्या सहाय्याने काळविटांना बाहेर काढले व जंगलात सुखरूप सोडले.
शिकारीची शक्यता
परिसरात शिकाऱ्यांनी या काळविटांना हाकलून गावाकडे आणले असावे, अशी शक्यता वर्तविली जात असून वनकर्मचारी तसा तपास करीत आहेत. हरिण व काळवीट बहिरम रस्त्यावर हमखास दिसतात. दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात हरणाचा मृत्यू झाला होता, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

मेळघाटचे व परतवाडा परिक्षेत्राचे जंगल लागून असल्याने रात्रीला तृणभक्षी प्राणी चाऱ्याच्या शोधार्थ येतात. त्यामध्ये हा अपघात झाला. काळविटांना जिवंत बाहेर काढून सुखरूप जंगलात सोडण्यात आले.
-हरिश्चंद्र वरगव्हाणकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.

Web Title: Lived two blacksmiths lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.