अवयवदानामुळे मिळेल अनेकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:40 AM2017-08-31T00:40:15+5:302017-08-31T00:40:31+5:30

शहरातील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानबाबत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.

 Livelihood for many | अवयवदानामुळे मिळेल अनेकांना जीवनदान

अवयवदानामुळे मिळेल अनेकांना जीवनदान

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : इर्विनमध्ये नागरिकांना दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानबाबत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. मृत्यू हा दु:खाचा प्रसंग असला तरी अवयवदानासाठी नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे. मानवी अवयव कृत्रिमरित्या तयार करता येणे शक्य नाही. त्यासाठी मृत्यूपूर्वी आणि नंतरही विविध मानवी अवयवदानासाठी नागरीकांना प्रवृत्त करावे लागेल. अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात अवयवदानाविषयी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अवयवदानात जात, धर्म विचारात घेतले जात नाही. त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होण्यास मदत होईल. समाजातील प्रत्येक नागरिकांनीे अवयवदानाचा संकल्प केल्यास तो पुढील पिढीसाठी एक संदेश असेल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी अवयवदानाबाबत शपथ दिली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक लोहकपुरे, रक्तपेढी प्रमुख विलास जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Livelihood for many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.