बहुरूपी व्यवसायावर वैद्य कुटुंबीयांची गुजराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:19+5:302020-12-11T04:30:19+5:30
पान २ साठी नांदगाव खंडेश्वर : अनेक पिढ्यांपासून विविध सोंगे घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजन करणारे आष्टी येथील मुकेश चतुर्भुज ...
पान २ साठी
नांदगाव खंडेश्वर : अनेक पिढ्यांपासून विविध सोंगे घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजन करणारे आष्टी येथील मुकेश चतुर्भुज वैद्य हे बहुरूपी कलावंत लोकांकडून मिळेल त्या दानावर कुटुंबाची गुजराण करीत आहेत. भगवान विष्णूचे रूप साकारून ते नांदगाव खंडेश्वर येथे आले होते.
पिढ्यानुपिढया सुरू असलेला हा बहुरूपी कलावंताचा व्यवसाय मुकेशने सुरू ठेवला आहे. ते विविध वेशभूषा साकारून शासकीय कार्यक्रमांतही सहभागी होतात. ग्रामस्वच्छता अभियान, एड्स जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा आदी कार्यक्रमांच्या सादरीकरणात त्यांचा सहभाग असतो. ते भगवान राम, हनुमंत, श्री शंकर आदी वेशभूषेत गावोगावी जातात आणि कुटुंबाची उपजीविका भागवितात. बहुरूपी कलावंतांना शासकीय अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.