मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:11 PM2018-01-30T22:11:40+5:302018-01-30T22:12:02+5:30
मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. कठोरा नाका परिसरात सोमवारी मुंगूस व साप यांच्यात जीवघेणी लढाई रंगली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. कठोरा नाका परिसरात सोमवारी मुंगूस व साप यांच्यात जीवघेणी लढाई रंगली होती.
कठोरा नाका परिसरात सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुंगसाने नागावर हल्ला केला. मुंगूस व नाग यांच्यात रंगलेला हा खेळ अनेकांच्या दृष्टीस पडल्याने घटनास्थळ बघ्याची गर्दी जमली होती. मुंगसाच्या हल्ल्यात नाग गंभीर झाल्याची माहिती कार्स संस्थेचे छोटू नागपूरे यांना कळली. त्यांनी जखमी नागाला पकडून सर्पमित्र चेतन भारतीकडे नेले. त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांशी सपर्क केला. डॉ. सुरज रूईकर यांनी उपचार सुरू करून त्याच्या जखमांवर टाचे मारले.
नागाच्या तोंड्याचे हाड पूर्णपणे तुटले असल्यामुळे त्याच्यावर उपचार करताना बरेच परिश्रम डॉक्टरांना घ्यावे लागले. सद्यस्थितीत नागाची प्रकृती ठीक असून, त्याला डॉक्टरांच्या व सर्पमित्रांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. या मोहिमेत अंकुश राऊत, शुभम गिरी, चेतन जिचकार व छोटू नागपुरे आदी सर्पमित्रांनी सहकार्य केले.