कोरोनाच्या संसर्गापासून पशुधन कोसोदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:49+5:302021-05-28T04:10:49+5:30

अमरावती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रोगाची लागण पाळीव जनावरांना होत नाही. मनुष्यातील विषाणू जनावरात ...

Livestock far from corona infection | कोरोनाच्या संसर्गापासून पशुधन कोसोदूर

कोरोनाच्या संसर्गापासून पशुधन कोसोदूर

Next

अमरावती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रोगाची लागण पाळीव जनावरांना होत नाही. मनुष्यातील विषाणू जनावरात संक्रमण करीत नाही, असे मत तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९ लाख ८८ हजार ४९९ जनावरे कोरोनापासून कोसोदूर (सुरक्षित) राहिली आहेत.

चीनमधून जगभरात कोरोना विषाणू वर्षभरापूर्वीच पसरला. या विषाणू विरुध्दच्या लढा देत आहेत. ऑक्सिजन व बेडसाठी रुग्णांची रोजच ससेहोलपट सुरू आहे. अशा परिस्थितीत माणसांपेक्षा जनावरे आरोग्याचे दृष्टीने साथीच्या रोगापासून सुरक्षित राहिले आहेत. मनुष्याच्या शिंकण्यातून व खोकल्यातून प्राधान्याने कोरोना विषाणूचा प्रसार मनुष्यात होतो. यामुळेच कोरोना रोग वेगाने पसरला गेला. मास्क घातल्याने या रोगाच्या संक्रमणही काही प्रमाणात रोखण्यात यश आले. मनुष्याच्या शिकण्यातून किंवा खोकल्यातून जनावरांना कोरोनाची लागण होऊ शकते का असा प्रश्न अनेक पशुपालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पाळीव जनावरांना कोरोनासारखे आजार झाल्याची एकही घटना अजून तरी पुढे आली नाही. त्यामुळे रोगापासून जनावरे पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

जिल्ह्यातील पशुधन संख्या

गाय_४६२०२३

म्हैस_१२८५८६

शेळ्या_३१२८८९

मेंढ्या_८२६०३

डुकरे_२३८९

एकूण_९८८४९९

कोट

संपूर्ण जगात आणि भारतात सुध्दा आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पाळीव प्राण्यांमध्ये झाल्याची नोंद नाही. पाळीव प्राणी कोरोनापासून सुरक्षित आहेत. मात्र, खबरदारी घेण्याची गरजेचे आहे.

- डॉ.नितीन कुरकुरे,

सहयोगी प्राध्यापक

विकृती शास्त्र विभाग

शासकीय पशुवैधक महाविद्यालय नागपूर

कोट

जिल्ह्यातील ९.८८ लाख पाळीव प्राणी एकदम सुरक्षित आहेत. कोरोनाचा संसर्ग प्राण्यांना होत नाही. सांगर्गिक रोगाचा कुठलाही प्रादुर्भाव नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पाळीव प्राण्यांपासून संक्रमित व्यक्तीने लांब राहावे.

- डॉ.विजय राहाटे,

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

जिल्हा परिषद अमरावती

Web Title: Livestock far from corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.