कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांना जीवदान

By admin | Published: February 22, 2016 12:42 AM2016-02-22T00:42:53+5:302016-02-22T00:42:53+5:30

गाईंची ट्रकमधून तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरूड पोलिसांना मिळाल्यावरून रविवारी पहाटे वाठोडा ते राजुराबाजार मार्गावर दोन ट्रकची तपासणी करण्यात आली.

Livestock killed 28 animals in slaughter house | कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांना जीवदान

कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांना जीवदान

Next

चार आरोपी अटकेत : वरूड पोलिसांची कारवाई, एक दिवसाची न्यायालयीन कोठडी
वरुड : गाईंची ट्रकमधून तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरूड पोलिसांना मिळाल्यावरून रविवारी पहाटे वाठोडा ते राजुराबाजार मार्गावर दोन ट्रकची तपासणी करण्यात आली. दरम्यान २८ बैल कोंबून नेत असल्याचे आढळले. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातून आडमार्गाने गोधनाची तस्करी मोठया प्रमाणात होत असल्याची परिसरात चचार् असतांना वरुड पोलीसांना आमनेरवरून दोन ट्रकमध्ये बैलांची तस्करी करून कत्तलखान्याकडे नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरुन ठाणेदार अर्जुन ठोसरे, जमादार उमेश ढेवले, अरुण बिलगये, प्रदीप खेरडे, सुरेश गांवडे सह वरुड पोलिसांनी सापळा रचून वाठोडा ते राजुराबाजार मार्गावरून टाटा ट्रक क्र. एम.एच.०४ जीसी-९५९१ आणि आयशर ट्रक क्र. एम.एच ३७ जी -२१११ जात असताना सदर ट्रकची तपासणी केली. तेव्हा यामध्ये २८ बैल कोंबून वरून ताडपत्रीने झाकून नेत होते.
यातील २८ बैल ४ लाख रुपये किंमतीचे आणि दोन ट्रक ९ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर गोवशांची तस्करी करणाऱ्या पाच लोकांना अटक करण्यात आली असून यामध्ये सय्यद फिरोज सय्यद मुनीम ३० रा. आमनेर ता. वरुड, सोहेल खान इब्राहीम खान २५ ताज नगर अमरावती, झुल्फीकार अब्दुल खलील २५ रा. कामठी जि. नागपूर, मुजनील अहमद महम्मद शकील १९ रा. कळंब जि. यवतमाळ यांचा समावेश आहे. वरुड पोलीसांनी ट्रकमधील मजूर आणि ट्रक मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Livestock killed 28 animals in slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.