‘स्टोमॅटायटीस’च्या विळख्यात पशुधन
By admin | Published: August 23, 2015 12:23 AM2015-08-23T00:23:06+5:302015-08-23T00:23:06+5:30
नवीन गवतामुळे जनावरांना ‘स्टोमॅटायटीस’ (तोंड, जीभ व हिरड्यावर व्रण) हा आजार होत आहे. मोठा जनावरांप्रमाणे शेळी, मेंढी सारख्या लहान जनावरांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण आहे.
तोंड, जीभ, हिरड्यांवर व्रण : घटसर्प, एकटांग्या रोगांची लागण
लोकमतविशेष
गजानन मोहोड अमरावती
नवीन गवतामुळे जनावरांना ‘स्टोमॅटायटीस’ (तोंड, जीभ व हिरड्यावर व्रण) हा आजार होत आहे. मोठा जनावरांप्रमाणे शेळी, मेंढी सारख्या लहान जनावरांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण आहे. पावसाळ्यामुळे होणाऱ्या घटसर्प व एकटांग्या रोगाची लागण जिल्ह्यातील काही भागात झालेली आहे.
गवताच्या शेंड्यावर असणाऱ्या जंतूपासून ‘स्टोमॅटायटीस’ या आजाराची जनावरांमध्ये लागण झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या तोंडात, जीभेवर व हिरड्यावर व्रण येतात व हे फुटल्यामुळे जनावरे चारा खात नाही. तसेच या आजारात जनावरांना ताप येतो. शेतकरी नियमित लसीकरण करीत नसल्याने आजार बळावतात. प्रतिजैविक इंजेक्शन व काही घरगुती उपचारामुळे हा आजार बरा होतो. पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे पशुंच्या खुरांमध्ये संसर्ग होऊन जखमा होत असल्याचे आढळून आले आहे.
हवामान बदलाने घटसर्प
अमरावती : ‘घटसर्प’ हा संसर्गजन्य आजार, हवामानात होणारा अचानक बदल, कुपोषण यामुळे प्रामुख्याने आढळून येतो, पावसाळ्यात या रोगाची लागण ‘पाश्चूरेल्ला मल्टीसीडा’ जिवाणूमुळे होतो.
टिपॅनोसिमियासीस
एकपेशीय परजीवांपासून जनावरांना होणारा आजार आहे. हा रोग गायी, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व घोड्यांना होतो. पावसाळ्यात या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. ‘टिपॅनोसोमा इव्हयाजाईन’ या एकपेशीय परजीवांपासून हा रोग होतो.
या रोगाची लक्षणे
शिघ्र प्रकार : या प्रकारामध्ये रोग एक ते दोन दिवस राहून जनावरांचा अचानक मृत्यू होतो. यामध्ये तीव्र ज्वर, शरीराचा समतोल बिघडणे, आंधळेपणा येणे, जनावरे गोलगोल फिरणे, त्याच्या चालीत फरक पडणे, चालताना तोल जाणे, अशी लक्षणे दिसून येतात.