शेतकºयांना निवारा मुलींच्या विवाहासाठी कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:37 PM2017-09-26T23:37:46+5:302017-09-26T23:37:58+5:30
आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवार २६ सप्टेंबर रोजी बँकेच्या ५६ व्या आमसभेत संचालक मंडळाने घेतला. याशिवाय कुपनलिकेसाठी दिल्या जाणारी १ लाखांची कर्जमर्यादा वाढवून १.७५ लाख करण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आमसभेत केली.
जिल्हा बँकेची वार्षिक सभा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सन २०१६-१७चा वार्षिक अहवाल, बँकेनी सादर केलेली हिशेब पत्रके, ताळेबंद व नफातोटा पत्रके व नफ्याच्या विनियोजनास मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकापेक्षा अधिक झालेल्या खर्चास सुद्धा मान्यता देण्यात आली. सन २०१७-१८ करिता मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षण दुरूस्ती अहवालाचे अवलोकन, सन २०१७-१८ च्या लेखापरीक्षणासाठी सहकार निबंधक, नाबार्डच्या पॅनेलवरील लेखा परीक्षकांची नियुक्ती आदी विषयांवर चर्चा झाली. बँकेचा वार्षिक ताळेबंद मांडताना देशमुख म्हणालेत, मागील वर्षी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला. याचा परिणाम बँकेच्या कर्जवसुलीवर झाल्याने थकबाकी वाढली. तरी यावर्षी एनपीए २७.१० टक्क्यांवर आला आहे. बँकेने एकूण ३९३.३३ कोटींचे कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेला ८.८० कोटी निव्वळ नफा मिळाला आहे. सभेला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, श्रीनिवास देशमुख, जयप्रकाश पटेल, पुरूषोत्तम अलोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड उपस्थित होते.
बँकेने राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात शेतकºयांना एक रूपयासुद्धा मिळाला नाही. परंतु बँकेने शेतकºयांकडून कर्जवसुली न करता मागील काही वर्षांत समाधानकारक नफा मिळविला. शेतकरी हितासाठी बँक कटिबद्ध आहे.
- बबलू देशमुख,
अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक